डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश विसर्जनात नागरिकांना मोठी मदत

संगमनेर l झुंजार न्यूज

काँग्रेसच्या राष्ट्रीय वरती कमिटीचे सदस्य तथा  उत्कृष्ट संसदपटू आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 400 युवक – युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना विसर्जनात मदत करताना प्रवरानदी काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.

गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी आलेले असतात काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ.सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा युवक – युवती फाउंडेशनच्या वतीने नदीकाठी साफ सफाई अभियान राबविण्यात आले यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील ब्लड कॅन्सर विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळूंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी या युवक – युवतींनी निर्माल्य गोळा केले.  यामध्ये 400 युवक – युवतींनी सहभाग घेतला. 50-50 च्या गटाच्या युवतींनी वेगळ्या ठिकाणी उभे राहून हे निर्माल्य गोळा केले. येणाऱ्या भाविकांना प्रवरेच्या पुराची माहिती सांगून आपण सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगर परिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठी सुद्धा विनंती केली. यामुळे अनेक शहरातील नागरिकांची सोय झाली.
यावेळी बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, यावर्षी राज्यभरात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने  मोठ्या आनंदात गणेश उत्सव साजरा झाला आहे. संगमनेरात भव्यदिव्य आरस व देखावे करण्यात आले सर्वत्र विद्युत रोषणाईस आनंदाचे वातावरण शहरांमध्ये स्वच्छता व पर्यावरण पूरक गणेश उत्सव करताना मंडळांनी सर्व धर्म समभाव जोपासत आनंदाचे पर्व निर्माण केले. दहा दिवस घरात आणि परिसरात आनंद निर्माण करणा-या गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाला दुःख होत आहे. परंतु ही परंपरा आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन आपण करत असतो. त्यानुसार प्रवराकाठी असलेल्या तळ्यांमध्ये अनेकांनी गणेश विसर्जन केले. शहरातील विविध नागरिकांनी आलेल्या गणेशाच्या निर्माल्याचे आम्ही कोरडे निर्माल्य व ओले निर्माल्य असे वेगळे करून एकत्रित केले व त्याची विल्हेवाट लावली.
अनंत चतुर्थीच्या दिवशी युवतींनी पुढाकार घेत निर्माल्य गोळा केल्याने मलाही खूप आनंद झाला. समाजामध्ये अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा फैलाव होत असून स्वच्छता हाच चांगल्या आरोग्यासाठी मोठा मूलमंत्र असल्याचेही डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकविराच्या सदस्यांनी विविध ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदतही केली.

गणेश उत्सवातून आनंदाचे व सर्वधर्मसमभावाचे वातावरण -आमदार थोरात

यावर्षी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी अतिशय शांततेत व उत्साहात गणेश उत्सव साजरा केला. गणेश उत्सवातून प्रेम सद्भावना मानवता वाढीस लागून सर्वधर्मसमभाव जोपासला जात आहे. स्वच्छता व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा झाला. असून मानाच्या गणपती सर्व गणपतीची मिरवणुकी गुलाल फटाके यांना फाटा देऊन पर्यावरण जपले जात आहे. मागील 22 वर्षांची ही परंपरा आहे.सर्वांनी एकत्र येऊन बंधू भावाची भावना वाढीस लागावी हा देश व राज्य अधिक समृद्ध व्हावे अशी प्रार्थना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. तर राज्यातील जनता यावर्षी महायुतीचे सरकार विसर्जित करेल असेही ते म्हणाले . मोठ्या आनंदाने गणेश मंडळांनी विसर्जनाची मिरवणूक काढल्या. यावेळी ढोल ताशाचा गजर व तरुणाईचा जल्लोष यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. गणेश विसर्जन व निर्माल्य एकत्र गोळा करुन प्रवरा नदीकाठ स्वच्छ ठेवणे कामी व विविध युवा संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला हे कौतुकास्पद असून सर्व नागरिकांचे व नगरपालिकेचे कौतुक केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed