मुंबई l झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात आयोजित ३९ व्या चक्रधर सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मा.ना. रामदास आठवले म्हणाले की, या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन आपण तीर्थक्षेत्रात आलो आहोत असे वाटते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून देशविदेशातील नामवंत कलाकार गेल्या 39 वर्षांपासून अखंडपणे आपल्या अद्वितीय प्रतिभेचे दर्शन घडवत आहेत, हीच खऱ्या अर्थाने महाराजा चक्रधरसिंहजींना खरी श्रद्धांजली आहे.

मा. रामदास आठवले म्हणाले की, महाराज चक्रधर सिंह हे स्वत: आदिवासी राजा होते, ते मूळचे चंद्रपूर महाराष्ट्र चे आहेत. त्यांनी छत्तीसगड मध्ये कथ्थक ‘रायगड घराणे’ या चौथ्या घराण्याची निर्मिती करून शास्त्रीय कला आणि संगीताच्या क्षेत्रात देशाला जागतिक पटलावर गौरवले आहे हे अतिशय आश्चर्यकारक आहे.

ना. राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, जेव्हा महाराज चक्रधर सिंह यांनी चक्रधर समारंभाची सुरुवात केली तेव्हा हा उत्सव संगीत क्षेत्रातील रोपट्यासारखा होता, ज्याचे आता देशातील नामवंत कलाकारांच्या सहभागाने मोठ्या सांस्कृतिक वृक्षात रूपांतर झाले आहे.

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात आयोजित ३९ व्या चक्रधर कार्यक्रमात माननीय राज्यसभा सदस्य. खासदार राजा देवेंद्र प्रताप सिंह जी, रायगड भागातील लोकसभा खासदार मा. राधेश्याम राठिया जी, आमदार मा. अनुज शर्मा, रिपाइंचे ज्येष्ठ नेते विजयकुमार गुप्ता, अभिषेक वर्मा, उषा आफळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

