आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील म्हस्के वस्तीवर बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास मांजराच्या शिकारीवरून दोन बिबट्या मादीमध्ये तासभर झालेल्या झुंजमध्ये अखेर एका मादीचा अंत झाला .

सविस्तर मिळालेली माहिती अशी की , बुधवार दि. १८ सष्टेबर २०२४ रोजी सावळेराम शिवराम म्हस्के यांची गुहा रस्त्यावरुन १०० मीटर अंतरावरील घराजवळून मांजराची शिकार करून घरापासून ७५ मीटर अंतरात ४१४ गट नंबर असणाऱ्या कपाशी शेतात शिकारीच्या नादात असताना एक वर्षाच्या बिबट्या मादीवर दुसऱ्या बिबट्यामादी हल्ला चढविला एक तास चाललेल्या हल्ल्यात यात एक वर्षिय मादी च्या नरड्याला जबर मार लागल्याने व तोडाबाहेर जीभ येवून करुण अंत झाला . एक तासभर म्हस्के वस्तीवर बिबट्यांच्या किंचवाणी डरकाळ्याचा मोठ – मोठ्याने आवाज येत असल्याने म्हस्के यांनी फटाके वाजविले . तर येथे मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .

गुरूवारी सकाळी साडे सातच्या सुमारास प्रमिला मांढरे या शेतात चारा आणण्यासाठी जात असताना कपाशीच्या शेतात बिबट्या मृत्य आवस्थेत आढळून आल्याने प्रमिला यांनी शेतमालक सावळेराम म्हस्के यांना सांगितले त्यांनी संरपच प्रमोद बोंद्रे व पत्रकार योगेश रातडियांना सांगितले त्यानंतर वन अधिकारी सुहास उपासनी व हरिचंद्र जोजार यांना सदर घटनेची माहिती दिली . त्यांनंतर वन अधिकारी व वन कर्मचारी देवीदास चौधरी यांनी घटना स्थळी येवून घटनेचा पंचनामा करत संपूर्ण परिसराची पाहणी करत येथे अजून दोन – तीन बिबट्या असू शकतात तेव्हा शेतकऱ्यांनी शेतात रात्रीचे फिरकू नये व हातात काठी बॅटरी ठेवूनचं काम करावे असे आवाहन वन अधिकारी सुहास उपासनी यांनी केले .

यावेळी सुहास उपासनी , देवीदास चौधरी , सावळेराम म्हस्के , राजेंद्र म्हस्के , संजय मांढरे , पत्रकार राजेश गायकवाड आदीसह शेतकरी उपस्थित होते .

