{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

श्रीरामपूर l झुंजार न्यूज

गेल्या १५ वर्षाच्यापासून भाजपा व रिपाई पक्षाचे मैत्रीपूर्ण संबंध असताना सुध्दा राज्यात रिपाईच्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान पुर्वक न्याय मिळत नसल्याने दलित समाज्यासह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येताना दिसत आहे मात्र होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षित असणारी श्रीरामपूरची जागेसह राज्यात १२ जागा व महामंडळे महायुतीतून मिळावी ही दलित समाज्याची व रिपाई कार्यकर्त्याच्या भावना असून जर रिपाई पक्षाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ठेंगा दाखविल्यास यांचे वेगळे परिणाम विधानसभा निवडणुकीमधून दिसेल . ” अभी तो नही तो फिर कभी नही ” आता रिपाई चुप बसणारी नसून आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी भीम गर्जना केली .

 

 

 

श्रीरामपूर शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यकर्ता बैठक व पत्रकार परिषदेत विजयराव वाकचौरे बोलत होते .

 

यावेळी राज्य सचिव राजाभाऊ कापसे , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल , जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू बनसोडे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिरकांडे , अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ , जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन , राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे , धनजंय निकाळे , सागर गुंजेकर , राजू नाना गायकवाड , विनय पवार , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्नेहलताई सांगळे , सदिप सरोदे , राहुल ढगे, सोनू बागुल , विलास ठोंबरे , सुनिल कसंबे , किरण कसंबे , राहुल ठोंबरे , सचिन खांडरे , निलेश हुसळे , योगेश बनसोडे , सनी जाधव , रॉकी लोंढे , राहुल बागुल , गणेश खैरे , देवा साळवे , मोनू पठाण , रोहीत बागुल , सुरेश जगताप , खेमनर , सुरेश जगताप , सुशील घाईजे , विजय पवार , आबा रन्नवरे आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

 यावेळी विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की ,   केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या काना कोपऱ्यात पोहचला असून सर्व समाज्यातील लोकांचे आठवले यांच्यावर विशेष जिव्हाळा व प्रेम आहे राज्यातचं नव्हेतर देशातील प्रत्येक गावा – गावात रिपाईचा कार्यकर्ता दिसून येत आहे . २००९ पासून ना. रामदास आठवले यांनी भाजपाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याने गेल्या १५ वर्षात कार्यकर्त्यांनी तन – मनाने प्रामाणिक व निष्ठेने मित्रत्व जपले मात्र भाजपाच्या नेत्यासह कुठल्याही कार्यकर्त्यांनी आता पर्यंत रिपाई कार्यकर्त्याला विश्वासात घेवून सत्तेच्या प्रवाह आणले नाही . किती दिवस यांची हुज्यागिरी करायची असा मत प्रवाह दलित समाज्यात पसरला गेल्याने भाजपासह मित्र पक्षावर समाज्यात नाराजी निर्माण झाल्याने हे सर्व एका माळेचे मणी आहे यांना दलित समाज्यातील माणसे सत्तेत चालत नाही चालतात फक्त मताकरिता असे परखड मत व्यक्त करत विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केले . 

 

 

 

 
नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मित्र पक्षाने (  महायुती )  वर वर माया , खाली निजग बया ! या म्हणीनुसार रिपाई पक्षाला अंधारात ठेवले . शिर्डीच्या जागेची अपेक्षा असताना सुध्दा शिर्डीची जागा रामदास आठवले यांना दिली नाही त्याचा परिणाम लोकसभेत दिसून आला आता पुन्हा तीचं पुनरावृत्ती केल्यास यांचे परिणाम मोठे होतील गेल्या अनेक वर्ष रिपाई कार्यकर्त्याला सत्तेच्या प्रवाह सामिल करण्याची भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली नाही . हा प्रकार जाणुन – बुजुन होतो असे आता लक्ष्यात येवू लागले आहे . मात्र आता आम्ही सावधगिरीची भूमिका घेत आहोत रिपाई कार्यकर्ता आता आक्रमक झाला आहे . श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसह राज्यात रिपाई पक्षाला १२ जागा व कार्यकर्त्याना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळे देण्यात यावे याकरिता लवकरचं भाजपा प्रदेशाध्यक्षासह अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री यांची भेट घेवून रिपाईच्या मागण्या सादर करणार असल्याचे शेवटी सांगितले 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed