{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

श्रीरामपूर l झुंजार न्यूज

रिपब्लिकन पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ३ ऑक्टोबर रोजी सातारा येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी केले आहे.
 सातारा येथील तालिम संघ, पोलीस करमणूक केंद्राशेजारी तोफखाना येथे हा मेळावा होणार आहे. आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या मेळाव्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून अशोक गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुरेश बारसिंग, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे, राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, महिला आघाडी राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, मातंग आघाडी आनंदराव वायदंडे, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल , जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन आदींसह नागालँडचे आमदार उपस्थित राहणार आहेत.
तरी या मेळाव्याकरिता श्रीरामपूर , राहाता , संगमनेर , अकोले , नेवासा , राहुरी , कोपरगांव या तालुक्यामधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजाभाऊ कापसे यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed