निमगावजाळी आश्वी येथे जलपूजन संपन्न
संगमनेर l झुंजार न्यूज
निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे.पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुयोग्य नियोजनामुळे पाण्याचा थेट लाभ शेतीक्षेत्राला होणार असल्याने गावाचे अर्थकारणही प्रगतीच्या दिशेने जाईल असा विश्वास डाॅ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील निमगावजाळी आश्वी उंबरी बाळापूर येथे निळवंडे उजव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्याने गावातील बंधारे तलाव भरल्याने परीसरातील शेतकार्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.यानिमित आयोजित केलेल्या जलपूजन कार्यक्रमात डाॅ.विखे बोलत होते.सर्व गावामध्ये त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी होते.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने कालव्यांची काम मार्गी लागली.२०२४पर्यत पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान सर्वाना असल्याचे डॉ विखे म्हणाले.

कालव्याचा पाण्याचा लाभ थेट शेतीक्षेत्राला होणार असल्याने उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल.गावाचे अर्थकारण यामुळे बदलेल असा विश्वास व्यक्त करतानाच मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची प्रक्रीया सुरू आहे.विकास कामांचा चढता आलेख शिर्डी मतदार संघात कायम असून रस्त्याची काम व्यक्तिगत लाभाच्या योजना लोकापर्यत पोहचविण्यात जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला जात असल्याचे त्यानी सांगितले.

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बरोबरच बचत गटातील महीलांच्या उत्कर्षासाठी विखे पाटील यांच्या पुढाकाराने घेतला जात आहे.शिर्डी येथे सुरू होणार्या औद्योगिक वसाहती मधून युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल आशी ग्वाही त्यांनी दिली.

