कोपरगांव l झुंजार न्यूज 

 

सालाबाद‌प्रमाणे याही वर्षी श्रीश्रेत्र चासनळी येथे नवरात्र महोत्सवानिमीत्त ३ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान जगदंबा माता उत्सवाचे आयोजन कराण्यांत आले असून यानिमीत्त दररोज सायंकाळी ७ ते ९ यावेळेत जाहिर हरी किर्तन कार्यक्रम होत आहे अशी माहिती हभप बाबुराव महाराज चांद‌गुडे यांनी दिली. नऊ दिवस महिला जागर आहे. 
या सप्ताह काळात जगदंबा माता मंदिरात  पहाटे ४ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ८ दुर्गा सप्तशती ग्रंथ सामुदायीक पारायण, सायं ६ ते ७ हरीपाठ.
तर नऊ दिवस ह.भ.प. साक्षी बर्वे (३ ऑक्टोंबर) ह.भ.प. अर्चनाताई गिरी (४ ऑक्टोंबर) ह.भ.प. कान्होपात्राताई सोमासे (५ ऑक्टोंबर) ह.भ.प. सुनिताताई कातोरे (६ ऑक्टोंबर) हभप भानुदास बैरागी (७ ऑक्टोबर) हभप रेखाताई हांडगे (८ ऑक्टोंबर) ह.भ.प रेखाताई काकड (९ ऑक्टोबर) हभप शारदाताई सूर्यवंशी (१० ऑक्टोंबर) हभप गिताताई घोरवडकर (११ ऑक्टोबर) व हभप बाबुराव महाराज चांद‌गुडे यांचे १२ ऑक्टोंबर रोजी काल्याचे किर्तनाने उत्सवाची सांगता होईल.
सद‌स्चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चासनळी ग्रामस्थ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ व महिलामंडळ, जगदंबा कला क्रिडा, सांस्कृतीक मित्र मंडळ, स्वामी समर्थ मंडळ, हिँदुराज तरुण मित्र मंडळ, आण्णासाहेब साठे तरुण मंडळ, मानकेश्वर तरुण मंडळ, व जगदंबा यात्रा कमिटी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे नाशिक महिला भजनी मंडळाचा या उत्सव काळात भजनाचा कार्यक्रम होत आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *