आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेरत तालुक्यातील आश्वी बु तसेच परीसरातील गावे डेंगुच्या विळख्यात सापडेल असुन नुकताच आश्वी बु येथील १४ वर्षीय कु पियुश दिलीप ताजणे राहणार ताजणे मळा आश्वी बु यांची डेंगु सदृश्य आजारमुळे मृत्यु झाल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर माहिती अशी आश्वी बु ताजणे मळा हा नदीकाठी बसलेला असून

प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) निमगावजाळी अंतर्गत आश्वी बु गावासाठी स्वतंत्र उप आरोग्य केंद्र आहे. या अंतर्गत येथे एक डॉक्टर असुन येथे आरोग्य सेवक महिला व पुरूष हे दोन्ही पद अनेक दिसवापासुन रिक्त आहे.यामुळे अनेक साथीच्या रोगावर नियंत्रण करण्साठी अपुऱ्या कर्मचारी वर्गावर येथील आरोग्य यंत्रणाची भिस्त आहे. दरवर्षी पावसाळ्यात आश्वी बु व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणत साठलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाणात वाढते. यामध्ये अनेकदा डेंग्यू सदृश्य रोगांची लागण झाल्याचे दिसते. यात डेंग्यू व चिकणगुण्याची अनेक रोगी आश्वी बु परिसरामध्ये आढळल्याचे दिसते. असे असताना ही प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजीळी येथे आशा रूग्नाची आकडेवारी उपलब्ध नसते. शासकीय आरोग्य यंत्रनेच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रूग्णाना संगमनेर येथील खाजगी रूग्नालयात जावे लागते डेंगु अथवा चिकणगुण्या रूग्णाला उपचारासाठी २५ हजार ते ६० हाजार रूपये लागते तर खाजगी लॅब मध्ये डेंगुची संपुर्ण चाचणी करण्यासाठी २ हजार ते ३ हजार रूपये लागते.निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र आश्वी बु पासुन ७ कि.मी असुन जवळच आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मुळताच या केंद्रावर अधीपासुनच १५ ते २० गावाचा तसेच वाडी वस्तीचा ताण आहे. यातच आश्वी बु गावतील काही रूग्ण या ही केंद्रावर जात असते. जर आश्वी बु उपआरोग्य केंद्रावर रक्त तपासणी सुरू केल्यास सामान्य रूग्णाची आर्थीक लुट थांबवण्यास मदत होईल.

मोठ्या प्रमाणत असलेल्या खड्डे मुळे अचानक येणाऱ्या पावसामुळे पडलेल्या खड्यामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे साठलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होतांना दिसते.

साधारणत सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.

सामाजिक कार्यकर्ते बबन दारकु ताजणे यांचा मयत पियुश हा नातु होता तर दिलीप बबन ताजणे यांचा मुलगा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी नुकताच सांत्वन करण्यासाठी ताजणे मळ्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी विनायक बालोटे , अशोकराव जऱ्हाड , भिमा शिंदे , अशोक म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड , रोहिणी निघुते, अजय ब्राम्हणे, हरीभाऊ ताजणे, विजयराव म्हसे, वैभव ताजणे, संदीप ताजणे, अभिजीत म्हसे , नवनाथ ताजण , विक्रात ताजणे आदी होते.

डेंगु चा ताप डॉक्टराच्या लक्षात आल्यावर एनएस १ ही चाचणी करण्यात येते आवश्यकते नुसार आईजीएम व आईजीजी या टेस्ट सबंधीत रुग्णांच्या करण्यात येते. मयत पियुश दिलीप ताजणे यांच्या एनएस १ ही टेस्ट पॉझिटिव्ह होती तर आईजीएम तसेच आईजीजी दोन्ही टेस्ट निगेटिव्ह होत्या.
वैद्यकीय अधिकारी डॉ तय्यब तांबोळी
( प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगावजाळी )
