संगमनेर l झुंजार न्यूज
विधानसभा निवडणुकीच्या रेलचेल सुरु झाली असताना महायुतीने आप – आपल्या जागा जाहिर केल्या मात्र रिपाई अदयाप एक ही जागा सोडली नसल्याने जोपर्यंत महायुती रिपाईला श्रीरामपूरसह आठ जागा सोडत नाही तोपर्यंत रिपाईच्या कुठल्याही पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराचा प्रचार अथवा स्टेजवर जावू नये असे आवाहन रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे केले आहे .

विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद दिले. त्या बदल्यात त्यांना देशात, महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची भरभरून मते मिळाली. या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची महायुतीला मते हवी असेल तर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा रिपाइंला सोडायलाच पाहिजेल नाहीतर श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, अकोले मतदारसंघात महायुतीचा टांगा पलटी करायला वेळ लागणार नसून जोपर्यंत महायुतीकडून कुठल्याही प्रकार निर्णय होत नाही तो पर्यंत जिल्हयातील कुठल्याचं पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करू नये अन्यथा कारवाई होईल असे आवाहन केले तर …

आपल्याला मानपान , स्वाभिमान आहे की नाही आपल्या नेत्याचा कुठल्या बँनर फोटो नाही , बळजबरीने एसटीत बसू नका स्वाभिमानाने जगा ! श्रीरामपूर ही आपल्या हक्काची जागा ” अभी नही तो , कभी नही ” जागेबाबत विचार न झाल्यास जिल्हयातचं नव्हे तर संपूर्ण राज्यात बंडखोरी होणार , विजयी नाही पण पराजित निश्चित करु मग बघा असा इशारा वाकचौरे यांनी शेवटी दिला .

प्रसिद्धी पत्रकावर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांच्या सह्या आहेत.
Post Views: 702
