२४ ऑक्टोबर १९८१ रोजी अंभोरे येथील देशमुख आंभोरकर परिवारात रणजितसिंह देशमुख यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालणारा अंभोरक परिवार शिस्त, संस्कार, आदर, मान सन्मान, या संस्कारात रणजितसिंह देशमुख लहानाचे मोठे झाले. देशमुख परिवार पहिल्यापासूनच राजकारण, समाजकारणात असल्यामुळे रणजितसिंह देशमुख यांना ही समाजकार्याची गोडी लागली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी चळवळी मध्ये ते अग्रेसर होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा,आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शेतकरी ,कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा संकल्पक पुढे घेऊन जात असताना ,नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी राजहंस दूध संघाचे संचालक पदी रणजितसिंह देशमुख यांची निवड केली.

राजहंस दूध संघाला पहिल्यांदाच तरुण तडफदार आणि नव्या विचारांचा संचालक लाभल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या अपेक्षा उंचावल्या. आपल्या संचालक पदाच्या कार्यकाळात तरुणांना उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने व दुग्ध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा असल्यामुळे शेतकरी तरुण हा दुग्धव्यवसायात उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी तालुक्यात नवनवीन संकल्पना राजहंस दूध संघाच्या माध्यमातून राबवण्यास सुरुवात केली. विदेशात जाऊन तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ते परवडेल या हिशोबाने त्यांनी अनुदानित तत्त्वावर मॉडर्न डेरी फार्म (MDF), मुक्त संचार गोठा निर्माण करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन केले व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुक्त संचार गोठा व मॉडर्न डेरी फार्म तयार होऊ लागले. तालुक्यात दुग्ध व्यवसायाला अधिका अधिक गती येऊ लागली. एक जून 2014 रोजी जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून रणजितसिंह देशमुख यांनी राज्याला दिशादर्शक ठरेल असा जागतिक दूध दिन तालुक्यातील सावरगाव येथे साजरा केला. या कार्यक्रमाला तत्कालीन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व तत्कालीन दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण व देशभरातून दुग्धव्यवसायातील तज्ञ मंडळी उपस्थित होते.

पुढे मे 2015 मध्ये राजहंस होऊन दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. विरोधकांनी निवडणुका व्हाव्यात यासाठी रणशिंग फुंकले होते. परंतु रणजितसिंह देशमुख यांचे संचालक असताना चे कामाने तालुक्यातील दूध उत्पादक व संघाच्या अधिकारी-कर्मचारी प्रभावित झाले होते. रणजितसिंह देशमुख हेच दूध संघाचे चेअरमन व्हावे ही इच्छा सर्वांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे व्यक्त केली.रणजितसिंह देशमुख चेअरमन होत असतील तर आम्ही माघार घेण्यास तयार असल्याचे विरोधकांनी दाखवून दिले. व रणजितसिंह देशमुख ०१ जून २०१५ रोजी राजहंस दूध संघाचे चेअरमन झाले .आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय दूध संघाच्या माध्यमातून घेतले.दुष्काळी परिस्थित दुग्धव्यावसाय टिकून रहाण्यासाठी मुरघास ची संकल्पना संगमनेर तालुक्यात त्यांनी प्रथम सुरू केली.दुग्ध व्यवसायात महिलांचे योगदान हे महत्वाचे असल्या मुळे त्यांनी दुधाच्या पेमेंट वर आपल्या पती इतकाच अधिकार पत्नीला एकत्रित बँक खाते काढून मिळवून दिला.राजहंस महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी स्थानिक दूध संस्थे पासून तर दूध संघापर्यंतची सर्व माहीती व दुग्ध व्यवसायातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन केले, तसेच योजनेत सहभागी महिलांचा सपत्नीक १लाख रुपयांचा अपघाती विमा ही उतरवला गेला यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम त्यांनी तालुक्यात राबविले. तर दूरदृष्टी ठेऊन १५ टन क्षमतेचा दूध भुकटी प्रकल्प दूध संघाच्या माध्यमातून सन २०१८ साली सुरू केला. अनेक नवीन व अत्याधुनिक मशिनरी दूध संघामध्ये बसवले गेल्या.दूध संघ ते थेट ग्राहक या योजनेतून मोठ्या प्रमाणावर दूध विक्री केंद्रांची त्यांनी निर्मिती केली. हार्डमन कार्यक्रम, राजहंस गो सिद्धी व संकरित गो-पैदास योजना, जंत निर्मूलन व कावीळ लसीकरण, पोषक चारा निर्मिती अभियान, चापकटर वाटप , मिलकींग मशीन वाटप योजना, पशुरोग निदान प्रयोगशाळा, गाय पोळा सप्ताह, मॉडर्न डेअरी फार्म (MDF), मुक्तसंचार गोठे, राजहंस महिला सक्षमीकरण योजना, दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा छावणी या सारख्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी सुरू केलेल्या. या सर्व गोष्टींचा आदर सन्मान करत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ महानंदच्या संचालक पदी महायुतीचे सरकार असताना देखील त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचा कामाचा आवाका वाढत होता. शेतकऱ्यांना राजहंस दूध संघ चांगले भाव देत होता. त्यामुळे संघाचे संकलन मोठ्या प्रमाणात वाढले होते. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी दूध संघाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. शेतकऱ्यांना दुधावरील उत्पादन खर्च कमी व्हावा व उत्पन्न वाढावे या उद्देशाने त्यांनी माफक दरात औषधे उपलब्ध व्हावे यासाठी राजहंस मेडिकल स्टोअर ची संगमनेर मध्ये सुरुवात केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात घालून दिलेल्या तत्वांवर रणजितसिंह देशमुख काम करत असल्याचे ते नेहमी सांगतात. राजहंस दूध संघ हा राज्यात अग्रेसर असल्याचे मुख्य कारण म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेली शिस्त, चिकाटी व प्रामाणिकपणा ,नामदार बाळासाहेब थोरात यांचे दूरदृष्टी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रेम या सर्व गोष्टींमुळे आज दूध संघ शिखरावर असल्याचे रणजितसिंह देशमुख सांगतात. त्यांची प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत व दुग्ध व्यवसायाचा अभ्यास या मुळे सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंद च्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. काम करण्याची उमेद प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी च्या जोरावर रणजितसिंह देशमुख यांना अनेक पदांची जबाबदारी मिळत गेली. प्रत्येक पदाच्या व जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी दूध उत्पादकांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. २०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोना महामारी च्या काळात सर्वजण थांबून असताना देखील, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन दुग्ध व्यवसाय आहे. तो टिकला पाहिजे यासाठी ते धडपडत राहिले एकाच वेळी तालुक्याची आणि राज्यातील संपूर्ण सहकारी दूध संघाची जबाबदारी महानंद च्या माध्यमातून त्यांच्यावर असतानाही ते डगमगले नाही. त्याच कालखंडात त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला, पण धीर खचून न देता यावर मात करत पुन्हा नव्या जोमाने गगन भरारी घेण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विचारांवर सर्व सामान्यांसाठी झगडणारा हा शेतकऱ्यांचा तरुण नेता सज्ज झाला .

महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंदाचे मा.अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा..!
