आयुष्याच्या रणांगणावर सातत्याने यश मिळाणारे व्यक्तीमत्व म्हणजे रणजितसिंह देशमुख, ज्या दिवशी आपला जन्म झाला तो वार , ती तारीख भाग्यकारक लकी डे, आनंदाचा दिवस, तो दरवर्षी येतो तो म्हणजे Happy birthday.

खर तर या दिवशी आपण ऋणी व्हायच असत आपल्या आई वडीलांच , कारण त्यांनीच आपल्याला जन्म देउन हे जग दाखविले जमीनी पेक्षा मोठी माता , आकाशा पेक्षा मोठा पिता. आई जीवनदायिनी , पिता प्राणदाता, म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,

वाडा , बंगले ‘जमीन जायजाद इस्टेट प्रॉपर्टी, सोन गाड्या -घोडे नौकर चाकर हे आई वडीलांच्या पुण्याईने मिळत असते, मिळालेल सांभाळण्यासाठी सत्कर्म सदाचरण करावे लागते, कुठलही कार्य करण्यासाठी शिस्त असावी लागते. ही God gift रणजीत देशमुख यांना लगभलेले आहे.

छंद असतो. प्रत्येकाला कोणाला गायन, वाचन, लेखन, पर्यटन, स्वीमिंग सिंगीग, संगित, सिनेमा, नाटक , गेम वगैरे तसाचं रणजितसिंह देशमुखांना अश्व पालन , अश्वस्पर्धा ठेवण्याचा छंद असून त्यातून हिवरगांव पावसा सारख्या ग्रामिण भागात अश्व स्पर्धा , नृत्य , मेळावा व खरेदी – विक्री सुरु केल्याने राज्यासह परराज्यातील अश्वप्रेमी हिवरगांव पावसामध्ये दरवर्षी येवू लागले खंडोबाच्या यात्रेला महत्व प्राप्त होवून राज्यासह परराज्यात गणणा होवू लागली . यातून युवक , अश्वप्रेमी जोडले गेले . यातून मोठे युवा संघटन तयार झाले . या स्पर्धेमधून इतिहासातील अनेक पराक्रमी घोडयाचा उल्लेख होवू लागला . अश्व मेळाव्यामुळे अश्वाबाबत लोकांची धारणा वाढू लागली तालुक्याची एक नविन ओळख ही केवळ रणजित देशमुखमुळेचं झाली .

सहकार क्षेत्रात राज्यात नावलौकिक असणाऱ्या राजहंस दूध संघाच्या नेतृत्व करण्याची संधी रणजित दादांना मिळाली . या संधीच सोने करून अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वी केले काम करण्याची जिद्द व हातोटी असल्याने युवक व दुध उत्पादक शेतकऱ्यांना दूध व्यवसायाचे महत्व पटवून देत शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंन्दा प्रपंच्या करिता खूप फायदेशीर असून शेतक-यानी दूध धंन्दाला प्राधान्य देत घरसंसारकरिता हा आधार आहे . हे समजावून ग्रामिण भागात दूध व्यवसायातून एक आर्थिक क्रांती निर्माण केली तर दूध उत्पादकांना मुक्त संचार गोठा , मॉर्डन डेअरी फार्मची कल्पना देत चारा टंचाई टाळण्यासाठी चारा कुटी संकल्पना राबविल्याने चारा टंचाईचे मोठे संकट दूर झाल्याने यांचे श्रेय रणजितसिंह देशमुख यांनाचं जाते .

ऐतिहासिक घटना ताज्या रहाव्या म्हणून युवकां करिता शिवराज्य निर्माण संघटना स्थापन करुन सर्व तळागाळातील युवकांना एकसंघ केले . यातून आचार – विचार व सर्वांगिण विकास प्रगती होईल हा विचार व ध्येय त्यांच्या मनामध्ये होते . व या संघटनेच्या माध्यमातून एकमेकांशी मैत्रीपूर्ण प्रेमसंबंध निर्माण होवून आदर राखला जाईल हीचं धारण होती .

Truth is stranger than fiction सत्य हे कल्पनेपेक्षा गुढ रम्य असते. हसरा चेहरा धार्मिकतेची आवड विठ्ठलभक्त असलेल्या रणजित देशमुखांना वाढदिवसानिमीत्त हार्दीक देतो . दादांच्या प्रगतीचा , विकासाचा आलेख सतत उंच उंच जावा येणारा प्रत्येक दिवस आंनदाचा यावा जीवन हे सुख शांती समृध्दी ने असावे ही इश्वरचरणी प्रार्थना.अभिष्टचिंतनाच्या खुप खूप शुभेंच्छा !

विक्रम शिवाजीराव थोरात
उपसरपच , पानोडी ग्रा.प. , संचालक : राजहंस दूध संघ
