{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

सौ.घोगरे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद

 

शिर्डी l झुंजार न्यूज

 

 

 

अनेक वर्ष एकाच घरात सत्ता असूनही राहता तालुक्यात विकास रखडलेला आहे. घराणेशाही दडपशाहीला विरोध करत सौ प्रभावती घोगरे यांनी दिलेल्या परिवर्तनाच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळत असून या परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन गणेश कारखान्याचे माजी चेअरमन ॲड.नारायणराव कारले यांनी केले आहे.

 

 

 

 

राहता तालुक्यातील पिंपळस, केलवड, अस्तगाव, साकुरी नांदुरखी येथील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी समवेत सौ प्रभावती घोगरे, सुधीर मस्के, पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते आणि सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना नारायणराव कारले म्हणाले की, नगर मनमाड रस्ता अनेक वर्षांपासून रखडला आहे. निळवंडे चे पाणी दुष्काळी भागाला अजून मिळालेले नाही. शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ असूनही गावाच्या बाहेर विकास झाला नाही. एमआयडीसी यापूर्वी व्हायला हवी होती. आता निवडणुकीच्या काळात त्यांनी एमआयडीसीचा मुद्दा काढला आहे. मग इतके दिवस काय केले असा सवाल करताना हे फक्त निवडणुकीसाठी आश्वासन असून तालुक्यातून परिवर्तनाची मोठी लाट निर्माण झाली आहे. या ऐतिहासिक लाटी मध्ये सर्वांनी सहभागी होऊन सौ.प्रभावती घोगरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

 

तर सौ.घोगरे म्हणाल्या की, मी एक साधी गृहिणी आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. तालुक्यातील सर्व महिला भगिनीसह शेतकरी व युवक माझ्यासोबत आहेत. कुणीही दडपशाहीला घाबरू नका. लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहता तालुक्यात नक्कीच परिवर्तन होणार असून सर्वांनी मोठ्या मताधिक्याने पाठीशी उभे राहा येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या काळात गावागावात निळवंडे चे पाणी पोहोचवण्याबरोबर शिर्डी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न व नगर मनमाड रस्त्यासह या तालुक्यातील प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

 

यावेळी पंकज लोंढे,सचिन चौगुले,विक्रांत दंडवते यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.

गावोगावी उस्फुर्त स्वागत

 

सौ.प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ अनेक गावांमधून त्यांचे स्वागत होत आहे. महिलांकडून औक्षण केले जात असून तरुणाईचा मोठा पाठिंबा असल्याने राहता तालुक्यात यावेळेस नक्की परिवर्तन असल्याचे विक्रांत दंडवते यांनी म्हटले आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *