अकोले l झुंजार न्यूज

स्व मधुकरराव पिचड हे विविध समाज्यासाठी लढणारे नेते होते . अठरापगड समाज्यासह आदीवाशी समाज्याची तळमळ ही त्यांच्या कामातून दिसत असते राज्याच्या मंत्रीमंडळात काम करताना पिचड यांचे सातत्याने सहकार्य लाभत असे , पँथरसह रिपब्लिकन पक्षाला व कार्यकर्त्याना ते नेहमी सहकार्य करत असे केवळ आदीवाशी समाज्यापुरर्ते मर्यादीत न राहता त्यांनी सर्व समाज्याच्या कल्याणाकरिता विचार केला अशा बहुआयामी सहकाऱ्यांचे जाण्याने मन हेलावली त्यांच्या जाण्याने पक्षाचे नव्हेतर विविध सहकार्याचे मोठे नुकसान झाल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला .

प्रभावी वक्तीमत्वाला तालुका मुकला : विजयराव वाकचौरे 

सह्याद्रीच्या कुशीतून झेप घेत राज्याचे राजकारण आणि समाजकारण गाजविणारे मधुकरराव पिचड यांनी गाठलेले यशाचे शिखर थक्क करणारे होते. संघर्ष संयमाची परीक्षा घेणारा असेल तर यशही चमकदार असते, याचे ते मूर्तीमंत उदाहरण ! दिसले . आदिवासी समाजासह दलित व विविध समाजाच्या विकासासाठी झटणारे ते चौफेर व्यक्तिमत्व होते. प्रशासनावर पकड ठेवणारे ते प्रभावी मंत्री म्हणून लौकीक पिचड यांचा होता . मुर्ती लहान पण किर्ती महान म्हणी नुसार अनेक वर्ष मंत्री असताना त्यांनी संपूर्ण देशातील आदीवाशी समाज्याला सर्व क्षेत्राच्या प्रवाहात आणले दुर्गम अश्या तालुक्यात विकासात्मक परिवर्तन घडविले . अशा चौफेर व्यक्तीमत्वाच्या निधनाने अकोले तालुक्याच्या इतिहासातील एका लढवय्या पर्वाचा अस्त झाला असल्याची भावना विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .

माजी मंत्री तथा जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे नशिक येथे निधन झाले ही वार्ता संपूर्ण राज्यात पसरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह देशातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत आपली श्रध्दांजली वाहीली हीच दुःखद बातमी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना ही समजल्याने आपला एक जुना मित्र व सहकारी गमावल्याचे दुःख  राज्याचे रिपाई नेते विजयराव वाकचौरे यांच्याशी दूरध्वनी वरून व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त करुन कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याने दोन दिवसानंतर पिचड यांच्या कुटुबांला भेट देण्याकरिता येणार असल्याचे सांगितले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed