{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आश्वी गटातून अनेक जण बाशिंग बांधून रेडी ! आरक्षण सोडतीवर लक्ष !

आश्वी । झुंजार न्यूज

विधानसभेच्या निवडणुका संपल्या आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा निवडणुकींचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची भाऊगर्दी सुरू झाली. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची चाचपणी सुरु झाल्याने आरक्षण कोणतेही निघू, मात्र आपण प्रवाहात असल्याची जाणिव करून देण्याची कार्यकर्त्यांची धडपड सुरु असल्याचे चित्र संध्या दिसत आहे .

 

 

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गटात आरक्षणाचा विचार न करता तरुणाईमुळे काँग्रेसकडून विजय हिंगे, तर भाजपाकडून भारतराव गीते किंवा अॅड. अनिल भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. खरोखर ही लढत झाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागेल, अशी चर्चा होताना दिसत आहे. मात्र विजय हिंगे हे निवडणुक लढविणास इच्छुक नसल्याचे संध्या चित्र दिसत असले तरी उमेदवार कोणी ही असो थोरात – विखे यांच्यातचं खरी लढत होणार अशी चर्चा सुरू असून महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष सुध्दा नगर जिल्हयात निवडणुकीसाठी आक्रमक होणार असल्याने आश्वी , जोर्वे या दोन्ही गटावर दावा करणार असल्याने विखे काय ? भूमिका घेतात यावर लक्ष्य लागले असून रिपाई कडून आशिष शेळके यांचे नाव घेतले जात आहे .

 

 

 

 

आश्वी जिल्हा परिषद गट हा प्रवरा ४० गाव परिसरातीलयेत असल्याने बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. तर विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून व जुना ऋणानुबंधाने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव परिसरावर आहे. थोरात विखे एकत्र असो अथवा नसो, २०१९ पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे-थोरात काँग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्तसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही ठिकाणी अपक्षांची डाळ शिजली नाही. मात्र, विरोधाची ठिणगी पडली. ती आजपर्यंत एकमेकांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेवून एकमेकांवर टीकाटिप्पणी होताना दिसली . विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला त्यात विखे यशस्वी झाले . विखेनी अमोल खताळच्या रुपाने संगमनेर काबीज केल्याने विखे कार्यकर्त्यामध्ये आत्माविश्वास वाढला असला तरी स्वराज्य संस्थान निवडणुका या वेगळ्या पद्धतीचे असते त्यामुळे दोन्ही बाजूने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रयत्न होणार यात तिळमात्र शंका नाही.

 

 

 

आश्वी जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नाही. विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित , संगे – सोयरे व सधन लोकांनी व्यापलेला असून सामाजिक विषमतासह विविध क्षेत्राची जाण व बागयतदार भाग असताना सुद्धा विखे-थोरातांच्या भोवती वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. दोन्ही विधानसभेच्या सीमेवरील ही गावे आहेत. विकासात्मक कामे चढा ओढीने होताना दिसणार असले तरी आता दोन्ही विधानसभेचे आमदार महायुतीचं असल्याने राजकिय वातावरणात मोठा बदल झाला तरी ही निवडणुक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची असणार विजय हिंगे यांनी आश्वी गटातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत आश्वी बु ॥ ग्रामपचायतीच्या माध्यमातून व बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली आश्वीतून विकासात्मक मॉडेल निर्माण केल्याने पुन्हा एकदा आश्वी ग्रामपचायतीत काम करण्याची संधी मिळाल्याने जि प गटाचा उमेदवार म्हणून हिंगेकडे पाहिले जात आहे . तर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्यांमधील भारतराव गीते व ॲड अनिल भोसले हे असून भोसले हे निर्भिड वकील आहेत. पाच वर्षे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे उपसंरपच म्हणून उल्लेखनीय काम केले. तर भारत गीते यांच्या पत्नी पिंप्री लौकीचे सध्या संरपच असल्याने हे विकासात्मक ध्येय धोरण राबवत आहे . विखे – थोरात या दोन्ही बाजूने तरुण कार्यकर्ते जाळे असल्याने आश लढ जि प गटाची लढत रंगतदार ठरणार असली तरी थोरात – विखेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

 

 

 

 

प्रतिक्षेत असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक जण इच्छुक म्हणून दिसून आहे. मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल सांगता येत नाही. विखे गटाच्या अॅड. अनिल भोसले , भारतराव गिते , अॅड. पोपट वाणी, तबाजी मुन्तोडे , मच्छिंद्र थेटे, निवृत्ती सांगळे या जेष्ठांसह सुनिल मुन्तोंडे , अनिल म्हसे , मोहीत गायकवाड , अशोक जऱ्हाड , विकास गायकवाड  तर थोरात गटाकडून विजयराव हिंगे यांच्यासह गणपत सांगळे, डॉ. संजय सांगळे, राजेंद्र चकोर , प्रमोद बोंद्रे , या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपापल्या परीने त्यांनी फिल्डिंग लावली. मात्र, परिसरात लोकांच्या होणाऱ्या चर्चेतून मात्र थोरात गटाकडून विजयराव हिंगे तर विखे गटाकडून भारतराव गीते अथवा महायुतीकडून रिपाईला जागा दिल्यास आशिष शेळके हे इच्छुक उमेदवार जरी असले तरी विखे – थोरात अशी लढत दिसत आहे. ही लढत जर निश्चित झाली. तर याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले जाणार हे मात्र निश्चित.

 

 

 

 

 

 

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक माणसाच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत विकासात्मक कामाला प्राधान्य दिले, तर आश्वी बुद्रुकसारख्या मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे केली.जिल्ह्यात कोठेच नाही, असे राम मंदिर बनवत लोकांचे स्वप्न साकार केले तर छोट्या मोठ्या समस्या स्वकर्तृत्वाने सोडविण्यासाठी जरुर प्रयत्न केले मात्र जिल्हा परिषद निवडणुक न लढविण्याचा ठाम निर्धार केला

विजय हिंगे ( युवा नेते आश्वी )

विखेच्या माध्यमातून विकासात्मक घोडदौड करण्याकरिता जि प निवडणुक लढविण्याची संधी मिळावी म्हणून अनेक दिवसाचे स्वप्न आहे

भारतराव गीते ( जिल्हा सरचिटणीस भाजपा ) 
२०१४ पासून रिपाई हा महायुतीचा घटक पक्ष असून नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकीतून संगमनेर व शिर्डीतील महायुती उमेदवार निवडून येण्यासाठी नि:स्वार्थीपणे रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने संगमनेरमधून जोर्वे तर शिर्डीमधून आश्वी जि प गट व पचायत समिती दोन – दोन गण रिपाईला दयावे 
आशिष शेळके ( तालुकाध्यक्ष , रिपाई संगमनेर 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed