{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

ग्रामीण भागातील शाळा व विद्यालयात बाल आनंद मेळाव्याची संकल्पना ही खऱ्या अर्थाने चिमुकल्या मुला मुलींवर व्यवहारी क ज्ञान मिळवण्याचे एक उत्तम साधन असून बाल आनंद मेळाव्यामधून विद्यार्थी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात व भविष्यकाळात जगण्याचे उत्तम ज्ञान मिळते असे प्रतिपादन पिंपरी लौकी अजमपुर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव पाटील गीते यांनी केले

 

 

 

 

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटनसरपंच सौ संगीता गीते यांच्या हस्ते झाले

 

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे होते .व्यासपीठावर माजी उपसरपंच दौलतराव दातीर ज्ञानदेव गीते अहिलाजी लावरे भारत सुखदेव गीते लक्ष्मण गीते मारुती गीते चांगदेव दातीरबबनराव घुगे मुख्याध्यापक श्री तायगा शिंदे आदि होते .

 

 

 

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना गिते म्हणाले कि ग्रामिण भागातील विद्यार्थी – व विद्यार्थिनीना पुस्तकी ज्ञानाबरोबर आपल्या आयुष्यात व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणुन बाल आनंद मेळाव्यातुन ते निश्चित पणे मिळते आज अनेक क्षेत्रात शेतकऱ्यांचे मुले मुली मोठ मोठया व्यवसायात उतरत आहे पण त्यांना व्यावहारिक ज्ञान हे बालपणा पासुन मिळावे लागते . जुनी म्हण आहे पिकवता येते पण विकता येत नाही ति खरी आहे आजही व्यापारात महाराषट्रीयन मंडळी मागे आहे परप्रांतिय येवुन व्यापार करतात व आपण पिकवतो पण यापुढे आपण व्यवहारात ऊतरून व्यापाराचे ज्ञान अवगत करण्याचे आव्हान केले

 

 

 

याप्रसंगी या बाल आनंद मेळाव्यात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीनी स्वःत बनवलेले खाद्य पदार्थ विक्रीस आणले त्यास ग्रामस्थांनी भरभरून साद दिली . भाजीपाला फळे घेण्यासाठी गावातील महिला भगिनिनी मोठ्या प्रमाणावर हजरी लावुन भाजीपाला खरेदी केला .

 

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी केले . आभार उंबरकर सर यांनी मानले या बाल आनंद मेळाण्यासाठी मोठ्या संख्येने पालक ग्रामस्थ महिला उपस्थितीत होत्या .

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *