आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक व पुरातन अशा प्रभु श्रीराम, श्री दत्त व शिवभक्त पं.पु. पुजांआई माता मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीराम मंदिराला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
रविवारी सकाळी लोणी येथे पुंजाई वेलफेर फांऊडेशन आश्वी खुर्द यांच्या पुंजाई दिन दार्शिकेच्या प्रकाशना वेळी ते बोलत होते
यावेळी पद्मश्री डॉ. विठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे आश्वी खुर्दचे उपसरपंच बाबा भवर बापुसाहेब गायकवाड माजी उपसरपंच संजय गायकवाड माजी ग्रा.प. सदस्य संतोष भडकवाड कैलास ऊर्फ देवराम गायकवाड इंजिनिअर श्रीकांत कडलग आदि उपस्थित होते
आश्वी खुर्द येथे श्रीराम मंदिर प.पु. पुंजाआई माता मंदिर श्री.दत्त मंदिर असे संयुक्त मंदिर असुन या मंदिरासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटिल यांनी निवडणुकीपुर्वीच रुपये २० लाखा निधी मंजुर केला होता व कामही सुरु झाले होते पुढील कामास निधी कमी पडू देणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिली.तसेच पुंजाई दिनदर्शिकेचे कौतुक केले त्यामुळे ग्रामस्थांनी जलसंपदां मंत्र्याचे आभार मानले व मंदिर कामाचा आढावा घेत झालेल्या कामाचे समाधान मानत सर्वांनी एकत्र येत सुंदर असे मंदिर उभारावे असे आवाहान ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले
