आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी व आश्वी बु॥ ग्रामस्थांच्या संयुक्त विदयमाने जि.प. प्राथमिक शाळेत मोफत सर्व रोग निदान उपचार शिबीर संप्रन्न झाले . या शिबिरात ३४५ लाभार्थीयांनी लाभ घेत आश्वी व परिसरातून मोठा प्रतिसाद रुग्णांनी दिला .
डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आश्वी बु॥ येथील जि प प्राथ. शाळेत संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिबीरास सुरुवात करण्यात आले . शिबीरातून रुग्णांनाची तज्ञ डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या आजारावरील मोफत तपासण्या व उपचार करण्यात आल्या . या शिबीरात डॉ जगदीश चव्हाण ( मेडिसिन) , डॉ संकल्प (सर्जरी) , डॉ अनुराग ( सायकॅट्रिक) , डॉ हासे , डॉ. राहुल , डॉ अमित , डॉ ईशांत , डॉ स्नेहल काळे , डॉ अनन्या जैन , रुपेश घोटेकर, आकाश पाळंदे आदीनी सेवा दिली .

या शिबीरात आश्वी पोलिस निरिक्षक सोनवणे , माधवराव गायकवाड , अशोक म्हसे, विनायक बालाटे, अजय ब्राम्हणे, भाऊसाहेब जऱ्हाड, दशरथ खेमनर, संजय गायकवाड, अशोक जऱ्हाड, निलेश चोपडा, अनिल म्हसे, विजय म्हसे, अनिल कंगणकर, श्रीकांत जऱ्हाड, प्रसाद कंगनकर, नवनाथ ताजने, भीमा शिंदे, जानकीराम गायकवाड, राजू होडगर, संदिप बाचकर आदीनी उपस्थितीत राहून सहकार्य केले .

