शिर्डी । झुंजार न्यूज
२०२४ अहिल्यानगर जिल्ह्यासाठी राजकीय, सामाजिकदृष्टीने ऐतिहासिक ठरले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायद्या सोबतच काहींना तोटाही झालेला दिसला. लोकसभा निवडणुकीत महायुतीवर ओढावलेली नामुष्कीची परतफेड विधानसभा निवडणुकीत झाल्याचे समोर आले. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या तिघा माजी मंत्र्यांसोबतच अनेक विद्यमानांचा धक्कादायक पराभव झाला. तर प्रस्थापितांना डावलून मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसले .

दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालानंतर नगर जिल्ह्यातून मंत्री कोण होणार याचा अंदाज बांधला गेला, मात्र तेथेही धक्कातंत्राची प्रचितती आली. राधाकृष्ण विखे पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मंत्री पदाची संधी मिळत जलसंपदा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर जामखेड मधून पराभूत झालेले प्रा. आ. राम शिंदे यांचा भाजपा पक्षातील राजकीय स्थान आधोरेखीत राहिल्याने त्यांना विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी मिळाल्याने फरांदेनंतर पुन्हा एकदा शिंदे यांच्या रुपाने ” विधान परिषदेच्या ” सभापती ” आपले नाव कोरत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. विखेंचा पराभव करत नीलेश लंके जायंट किलर ठरले अन् थेट संसदेत पोहचले. शिर्डीतून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे याचा पराभव करत उबाठा सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली.

लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती, मात्र अनपेक्षीतपणे जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली अन् लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला. आठ वेळेस आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे या तीन माजी मंत्र्यांनाही पराभवाचा धक्का बसला. उत्तर जिल्ह्यातून मतदारांनी महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले यांच्यासह विक्रम पाचपुते या नव्या दमाच्या चेहऱ्यांना मतदारांनी पंसती दिली. एकूणच जिल्ह्याच्यादृष्टीने २०२४ हे वर्षे राजकीय उलथापालथीचे ठरले.!

२०२४ च्या शेवटच्या टप्प्यात राज्याच्या राजकीय वर्तुळात ज्येष्ठ नेते मधूकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त हे धक्कादायक ठरले. राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे आदिवासी समाजाचे नेते म्हणून ओळख असणारे पिचड यांच्या रुपाने बडे नेता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी ३७६५ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी विक्रमी २७ लाख ४२ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक शाखेने केलेल्या जनजागृतीतून सरासरी ७२.४७ टक्के मतदान झाले. त्यात ७४.१२ टक्के पुरुष, तर ७०.७२ टक्के महिला मतदारांचा समावेश होता.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील २०२६ मतदान केंद्रांपैकी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. यासाठी त्यांनी प्रतिमशीन ४७ हजार २०० रुपयांप्रमाणे १८ लाख ८८ हजार रुपये कोषागार विभागात भरले आहेत. खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. त्यामुळे न्यायालयातील आदेशानंतर ४० मशीनसंदर्भात जिल्हा निवडणूक शाखा निर्णय घेणार आहे.
विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जिल्ह्यातील १२ पैकी १० मतदारसंघांतील उमेदवारांनी ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अभिषेक कळमकर यांनी तीन, तर राहुल जगताप, प्रभावती घोगरे व प्रताप ढाकणे यांनी प्रत्येकी दोन, शंकराव गडाख यांनी १०, बाळासाहेब थोरात यांनी १८, राम शिंदे यांनी १७, प्राजक्त तनपुरे यांनी ५ , तर संदीप वर्पे यांनी १ अशा प्रकारे जिल्ह्यातून ७४ मतदान ईव्हीएम पडताळणी साठी अर्ज केलेले आहेत.
जिल्ह्यातील लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर साधारण दोन महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली होती. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व शांततेत प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक शाखेने महत्त्वाची भूमिका बजावली.
संगमनेर मतदारसंघातून सलग ९ वी निवडणूक लढवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा नवख्या अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला असला तरी डॉ सुजय विखेंनी ही निवडणुक मनावर घेतल्याचे दिसून आले. नेवासा मतदारसंघात अनपेक्षीतपणे विठ्ठलराव लंघे यांनी उबाठा सेनेचे शंकरराव गडाख यांचा पराभव केला. पानेरमधून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असणारे काशिनाथ दाते यांनी विजयश्री मिळवत विधीमंडळात पाऊल ठेवले. श्रीरामपुरातील तिरंगी लढतीत काँग्रेसचे हेमंत ओंगले यांचा विजय झाला खरा मात्र मतविभागणी पथ्यावर पडल्याचे निकालातून समोर आले. ऐनवेळी उमेदवारी बदलत करण्याची रिस्क घेताना श्रीगोंद्यात पहिल्यांदा निवडणूक लढवणारे विक्रम बबनराव पाचपुते यांनी विजयी सलामी दिली.
–
कर्जत-जामखेडमधून विधानसभेला पराभूत होवूनही प्रा. आ.राम शिंदे यांना भाजपने प्रमोट करत विधान परिषदेचे सभापती पद दिल्याने शहप्रतिशह पणाचे स्रुप दिल्याचे दिसत आहे असले तरी शिंदे अथवा अजित पवाराकडून मात्र दुर्लक्ष झाले तर भाजपाकडून उत्तर जिल्ह्यात विखेंना मंत्री पद तर दक्षिणेत आ. शिंदे यांना सभापती पदाची संधी देत जिल्ह्याच्या राजकारणात समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

नव्यानं झालेल्या फडणवीस सरकारमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा ची जबाबदारी दिल्याने अनेक वर्षापासून कोकणातून पाणी आणण्याचे स्वप्न बघणारे स्व पदमविभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरणार असे चिन्हे जिल्हयाला दिसू लागल्याने आक्रमक स्वरुपाचे विखें काय निर्णय घेणार यांची कुतुहूल लागले आहे .

गेल्या ५ दशकापासून निळवंडे धरणाच्या कालव्या द्रारे येणाऱ्या पाण्याची प्रतिक्षा महायुती सरकारने दूर केली डाव्या व उजव्या कालव्याद्रारे आलेले पाणी बघून गावोगावी लाभार्थीयांनी उत्सव साजरा केला . तर विखेसह थोरातांनी ही आलेल्या पाण्याचे पूजन केले .

