संगमनेर । झुंजार न्यूज

राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माहे जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासनाने प्रती लिटर ५ रूपये अनुदान देण्याची योजना राबविली. तर आक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यासाठी ७ रूपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माहे सप्टेंबर २०२४ पर्यत दूध उत्पादकांना प्रति लिटर ५रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. मात्र माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे अनुदान दूध उत्पादकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने दूध उत्पादकांना प्रति लिटर ७ रुपये अनुदान देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व माहे डिसेंबरपासून पुढील कालावधीकरिता ही अनुदान योजना चालु ठेवावी, अशी संगमनेर दूध संघाचे संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी  मागणी केली आहे. 
रणजीतसिंह देशमुख पुढे म्हणाले की दुग्धव्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत असुन शासनाने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. डिसेंबर महिना संपला तरी डिसेंबर महिन्याचे अनुदान देणेबाबतचा ठोस असा निर्णय शासनाने अद्यापपर्यत घेतलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. शासनाने अनुदान निर्णयाबाबत विलंब न लावता तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहनही रणजीतसिंह देशमुख यांनी केले. सद्यस्थितीत दूध भुकटी व बटरचे दर स्थिर आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दुधाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच चा-याचे व पशुखाद्याचे भरमसाठ दर वाढलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आर्दीसह सर्व मान्यवर उपस्थित होते.

राजहंस दूध संघाकडून नवीन वर्षात १ रुपये प्रति लिटर दूध दरवाढ : देशमुख

संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कायम तालुक्यातील शेतकरी व दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने नवीन वर्षात प्रती लिटर १ रूपये दूधा दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरूवात संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने आनंद देणारी असल्याची माहिती चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. या निर्णयामुळे तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले चित्र दिसत आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *