संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची माहिती

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून माहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातूननोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 18 हजार 274 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 5 कोटी 96 लाख 65 हजार 900 रुपये लाभा र्थ्यांच्या बँकखात्यावर आज बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले

 

 

 

 

 

 

जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा डॉ सुजयदादा विखे पा यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावरती संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकल्यानंतर आमदार खताळ पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील गोर गरीब, वृद्ध निराधार ,दिव्यांग, विधवा ,परी तक्ता बंधू आणि भगिनींना वरील या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे या वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले

 

 

 

 

 

सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 6280 लाभार्थ्याना 2 कोटी 61 लाख 74 हजार 400 रुपये ,माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 617 लाभार्थ्याना 18 लाख 33 हजार 900 रुपये , माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 259 लाभार्थ्यांना 7 लाख 71 हजार रुपये ,माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्व साधारण 5676 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख 72 हजार रुपये ,माहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अनुसूचित जाती 681 लाभार्थ्यांना 20 लाख 43 हजार रुपये , माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती 322 लाभार्थ्यांना 9 लाख 66 हजार रुपये. माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4439 लाभार्थ्यांना 1 कोटी 13 लाख 5 हजार 600 रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्या वर आज सायंकाळी पर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे आमदार खताळ यांनी आभार मानले.

 

 

 

 

 

 

 

 

संजय गांधी निराधार योजने पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संजय गांधी कार्यालयाशी संपर्क साधावा

 

 

 

 

 

 

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थोडा कालावधी लागला आहे आज सायंकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे आणि ज्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

 

 

आमदार अमोल खताळ

सदस्य संगमनेर विधानसभा मतदारसंघ

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *