श्रीरामपूर । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच सर्व दलित संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून गावोगावी जावून मोर्च्याचे नियोजन करण्यात येवून होणाऱ्या मोर्च्यास मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रिपाईचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , सुभाष त्रिभुवन करताना दिसत आहे .
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहेलना करणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहे. अमित शहा यांनी याबाबत जाहीर माफी मागावी, तसेच परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडी असताना मृत्यू झाला.या प्रकरणातील दोषींवर तसेच त्या पोलिसांवर हत्त्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, तसेच बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना अमानुषपणे मारहाण करुन हत्या केली आहे. त्याच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्यासाठी शुक्रवार दि . १० जानेवारी २०२५ रोजी श्रीरामपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले सांगितले जात आहे.

याप्रसंगी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ, विजय पवार, राजुनाना गायकवाड, योगेश बनसोडे, राजेंद्र मगर, सुरेश जगताप, आबा रणनवरे, मनोज काळे, विशाल सुरडकर, मोहन आव्हाड, संजय बोरगे, अंतोन शेळके, रमेश अमोलिक, मोजेस चक्रनारायण, हितेश पवार, प्रदीप कदम, प्रदीप गायकवाड, सलीम शेख, महिला आघाडीच्या उ.म. उपाध्यक्षा रमादेवी धिवर आदी पदाधिकारी गावोगावी जावून लोकांना मोर्चात सामिल होण्याचे आवाहन करत आहे .

तरी या होणाऱ्या मोर्चा हा भूतोन् भविष्य होणार असल्याने सर्व समाज्यातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन यांच्या कडून करण्यात येत आहे.
Post Views: 714

