आश्वी । झुंजार न्यूज
स्वातंत्र्याच्या एक पर्वानंतर चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या लाभारक शेतकऱ्याला निळवंडे धरणाचे पाणी मिळण्याचे भाग्य माजी महसूल मंत्री व सध्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथांग प्रयत्नांमुळेचशक्य झाले त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थाने नवचैतन्य निर्माण झाले .
शेतकऱ्याच्या दृष्टीने खरे जलनायक हे नामदार विखे पाटील च आहे त्यानिमित्त भंडारदरा व निळवंडे पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकी प्रसंगी निळवंडे धरण उजवा कालवा कृती समितीचे अध्यक्ष श्री भारत पाटील गीते व कालवा समितीच्या सदस्यांच्या वतीने नामदार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकी प्रसंगी श्री भारत गीते यांनी निळवंडे धरण उजवा कालवा चाऱ्या संदर्भातमंत्री महोदयांचेलक्ष वेधून त्यांनी लवकरात लवकर उजव्या कालव्याच्या चाऱ्या व्हाव्यात अशी मागणी केली यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या तसेच त्यांनी जोपर्यंत चाऱ्या होत नाहीत तोपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांना शेतीतील पिकांना पाणी मिळावे म्हणून ज्या ठिकाणी मोठमोठी ओढे व नाले आहेत त्या ठिकाणी कॅनॉल ला तात्पुरत्या पद्धतीने ब्लॉक बसून ती धरणे भरून द्यावेत अशी मागणी केली तसेच कॅनॉल कॉंक्रिटीकरण संदर्भात सविस्तर चर्चा करून याबाबत मंत्रिमहोदयांनी गंभीर्याने लक्ष घातले याप्रसंगी विविध जलसंपदा विभागाचे रेगाळलेले कामे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागतील असा विश्वास श्री गीते यांनी व्यक्त केला
याप्रसंगी ज्येष्ठ नेते ॲड पि.जी वाणी भाऊसाहेब लावरे रामदास दातीर भाऊसाहेब मुंडे भीमराज गीते महादेव गीते रमेश कदम रमेश गीते सुरेश राव नागरे अदी सह लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

