आ अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या प्रलंबित असणाऱ्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या. अशी मागणी आमदारामुळे खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली त्यावरती संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ अमोल खताळ यांना दिला.

 

 

 

 

 

 

संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली ४०वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शना खाली मंजूर असलेली अनेकविकासकामे जोरात सुरू झाली आहेत. सुरू असणारी सर्व कामे चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी आपण संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. मात्र प्रलंबित असणारी विकास कामे, शहराचे सुशोभी करण, तालुक्याच्या ग्रामीण भागातविविध गावातील रस्ते, पाणीटंचाई सारखे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे त्यासाठी आ अमोल खताळ यांनी मुंबईत मंत्रालयात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

 

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. प्रलंबित असणाऱ्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारा अमोल खताळ यांना दिला.त्यामुळे आता खर्याअर्थाने संगमनेर तालुक्यातील प्रलंबित असणारी विकास कामे जोरात सुरू होणार आहे यात आता कुठलीही शंका घेण्याची गरज नाही.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *