आश्वी । झुंजार न्यूज

आज ही वर्तामनपत्रला शाश्वत पुरवा म्हणु ग्राह्य धरले जाते यामुळे त्यांची महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येते.पत्रकारीच्या माध्यमातुन येथील पत्रकार ग्रामीण भागातील समस्या ह्या निर्भिडपणे शासन दरबारी मांडत असतात. तसेच त्याचे निराकार होत नाही तो पर्य़त त्या घटनेचा पाठ पुराव करत असतात. काळाच्या पटलावर परीक्षण केले तर असे लक्षात येईल की सध्याचा काळ हा नैतिक पत्रकारितेच्या इतिहासातील सुवर्ण काळ असल्याचे प्राचार्य देवीदास दाभाडे यांनी सांगितले.
पिप्रीलौकी अजमपुर तालुका संगमनेर येथे कला वाणिज्य विज्ञान व संगणकशास्र् महाविद्याल आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीर च्या सांगता प्रसंगी पत्रकार दिनाचे आवजित साधत यावेळी पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी प्राचार्य देवीदास दाभाडे बोलत होते यावेळी आण्णासाहेब भोसले,सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते, सरपंच संगिता भारतराव गिते, उपसरपंच बाजीराव गिते , भारतराव गीते , प्रा. अमित शिंदे ,प्रा गणेश खेमनर,प्रा गौरी क्षिरसागर, प्रा खेमनर, गोरक्षनाथ गिते, कैलास गिते, बाळासाहेब गिते, तान्हाजी गिते, मगन गिते, विठ्ठल दातीर,विजय कदम,  आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.पत्रकार हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. सत्ताधार्य़ावर अंकूश ठेवण्यासाठी आणि विरोधाकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पत्रकारांना निपक्षपाती पणाची लेखणी,त्याचे आचारविचार हे निपक्षपाती ,निरपेक्ष स्पष्ट आणि समाजहिताला पोषक असावे लागते तसे असले तरच समाजावर पर्यायाने शासन कर्त्यावर पत्रकारंचा वचक राहु शकतो.
यावेळी पत्रकार वैभव ताजणे, रविद्र बालोटे ,संजय गायकवाड,योगेश रातडीया,राजेश गायकवाड यांचा झाड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed