आ अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर गट विकास अधिकाऱ्यांनी दिला टँकर
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील काकडवाडीयेथील महालक्ष्मी मातेच्या यात्रेनिमित्त नान्नज दुमाला येथील खंडोबा महाराज देवस्थान यात्रेच्या निमित्ताने आ अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर संगमनेरचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी त्वरित पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवून यात्रेकरूंची तहान भागविली
संगमनेर तालुक्यातील तळेगाव जवळील काकडवाडी येथे महालक्ष्मी मातेचे जागृत देवस्थान आहे या महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव दरवर्षी विविध धार्मिककार्यक्रमांनी साजरा होत असतो याही वर्षी या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून काकडवाडी येथील अर्जुन शिरसाठ यांनी आ अमोल खताळ यांच्या कडे टँकरची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली.तसेच नान्नज दुमाला येथीलखंडोबा महाराज देवस्थान यात्रेनिमित्ताने येणार्या भावीक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गावातील तरुणांनी सुद्धा मागणी केली होती
या दोन्ही गावाच्या मागणीचा विचार करून आ खताळ यांनी तात्काळ गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना शासकीय टँकर पाठ विण्याचे सूचना केल्या त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी या दोन्ही गावांसाठी टँकरची व्यवस्था करून दिली त्यामुळे या दोन्ही गावातील भाविकभक्तांनी आ अमोल खताळ आणि अनिल नागणे यांचे ऋण व्यक्त केले आहे
