Oplus_131072

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

लोणी संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस व्यक्ती चा अहिल्यानगर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला

 

 

लोणी संगमनेर रस्त्यालगत निमगाव जाळी शिवारात ५५ वर्षीय अनोळखी पुरुष अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, दाढी वाढलेली काळी पांढरी, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी काळी पांढरी, चेहरा उभट, नाक सरळ, अंगात मळकट रंगाचा पांढ-या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची मळकट पॅन्ट असे वर्णन असलेला पुरुष बेशुध्द अवस्थेत आढळुन आला असता आश्वी पोलिस स्टेशन ने उपचारा साठी सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथे दाखल केले असता सदर अनोळखी इसम हा सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ०९/३०वा औषधोपचारादरम्यान मयत झाला आहे.

 

 

 

 

सदर व्यक्ती बद्दल काही माहीती असल्यास आश्वी पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार आर डी पारधी यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *