संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील नेते श्रीकांत भालेराव यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने अमृत महोत्सव साजरा करण्यात आला .

दुपारी 3 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांनी हिवरगांव पावसा पावसा येथे येवून श्रीकांत भालेराव व कुटुबांची भेट घेवून भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले की ,

” आंबेडकरी चळवळीला उभारी व आकार देण्याकरिता व बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाच्य वाढीकरिता अनेकांनी आपले निस्वार्थीपणे आयुष्य वेचले अशा चळवळी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांला आपल्या जीवनाचे मुल्य हे समाज्यातून होणाऱ्या सन्मानातून समजते .

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , प्रकाश लोढे , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , रमेश शिरकांडे , चद्रकांत सरोदे , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे विजय खरात , सिध्दार्थ खरात , यादवराव पावसे , आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .

तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ सुधीर तांबे , नवी मुंबई माजी महापौर सुधाकरराव सोनवणे , शिवसेनेचे जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , वंचित बहुजन राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते , राजेंद्र गवांदे , अमित काळे , पावसे , माणिक यादव , पप्पू बनसोडे , ॲड किरण रोहोम , चद्रकांत सरोदे , आबासाहेब चासकर , रमाताई धिवर , दशरथ भालेराव , सुभाष त्रिभूवन , किशोर वाघमारे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिमा बोरुडे , स्नेहलताई दिवे , सपनाताई ढोलमपूरे आदीनी आपले मनोगत व्यक्त करुन भालेराव यांना शुभेंच्छा दिल्या .

यावेळी हिवरगां पावसा ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्यातून रिपाईसह विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते .
Post Views: 902

