शिर्डी । झुंजार न्यूज

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात आरपीआयला चार ते पाच जिल्हा परिषद जागा मिळाव्यात, जर जागा मिळाल्या नाहीत, तर काही ठिकाणी आपीआय स्वतंत्र निवडणूक लढवेल. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आरपीआयची आवश्यकता असल्यामुळे जागांबाबत योग्य समन्वय साधला जाईल, अशी माहीती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
Oplus_131072
शिर्डीत पत्रकारांशी बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा पोलिसांचा अहवाल आहे. तरीही अनेक लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. अजित पवार यांनी आरोप सिद्ध होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेतली ती योग्य आहे. आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंढे यांची भेट घेणे योग्य नसल्याचे ना. आठवले यांनी सांगीतले. शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची दुदैवी घटना घडली.
Oplus_131072
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अधिक दक्ष राहून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात याबाबत आपण राज्याच्या पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी शुक्ला यांच्याशी बोलणार असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील मयत झालेल्या संबंधित कुटुंबियांची आपण भेट घेतली. या हत्याकांडातील मयतांचा हल्लेखोरांशी कोणत्याही प्रकारचा वाद अथवा भांडण नव्हते, तरीदेखील हे अमानवी कृत्य घडले. त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारांना आळा बसला पाहीजे. धर्मांतर करून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि यासाठी सरकारने कडक कायदा करण्यात यावा, असे यावेळी ना. आठवले यांनी सांगितले.
Oplus_131072
यावेळी विजय वाकचौरे, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे, प्रकाश लोंढे, सुरेंद्र थोरात, सुनिल साळवे , रमेश शिरकांडे , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, धनंजय निकाळे, अनिल नन्नवरे , राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे, नाना त्रिभूवन, जितेंद्र दिवे, किरण कोळगे, दीपक शिंदे, बापू शिंदे, गणेश वाघमारे, अशपाक शेख, किशोर दंडवते, संदीप दंडवते, तुषार सदाफळ, लखन बनसोडे, सुनील लोखंडे, राहुल शिंदे, मुसा शेख, अकबर शेख, अतुल बनसोडे, बाळासाहेब खाडे आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed