Oplus_131072

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून संगमनेर मध्ये भव्य जयंती सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशन च्या संस्थापक तथा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात व सचिन आहेर यांनी दिली आहे.

         

 

 

Oplus_131072

 

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन 19 फेब्रुवारी हा महाराष्ट्रसह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. संगमनेर मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात दरवर्षी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने होत असतो. यावर्षी ही एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे .त्यानंतर श्री गणेशा साऊंड, युवकांची बाईक रॅली, तुतारी मंच, पेपर ब्लास्टिंग आणि पारंपारिक संबळ वाद्य असे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर दुपारी २  वा. मालपाणी लॉन्स येथे शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यान होणार आहे.

 

 

 

Oplus_131072

याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना , राजहंस दूध संघ , अमृतवाहिनी कॉलेज , यशोधन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर कारखाना कार्यस्थळावर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

 

 

 

Oplus_131072

 

तरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान तसेच तेजस गोर्डे, शैलेश आहेर, ऋषी काकड ,साहिल गुंजाळ, सोहम पलोड, आदित्य चकोर, मयूर कांडेकर, यश कांडेकर ,प्रसाद गुंजाळ, स्वरूप रहाणे ,ओम शिंदे, ओम जाधव, राज आयर्न काकड यांचा विविध युवकांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *