आश्वी । झुंजार न्यूज
१८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशां विरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला असल्याचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मुलींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जंयती निमित्याने महाराजाच्या प्रतिमेला पुष्प आप्रण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव शिदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते, संगिता क्षिरसागर,लता बिडवे, रंजना शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे शंशिकांत शिंदे, जऱ्हाड यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलतांना मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते म्हणाले की,बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय ‘सखाराम गणेश देऊस्कर’ यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देउस्कर जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगाल मध्ये स्थायिक होते. पुढे १९०५ मधे जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली.

यावेळी विद्यार्थीनी शिवाजी महाराजांचा विषयावर भाषणे, गाणी तसेच पोवाडे सादर केले.इत्ताय ४ थीची विद्यार्थीनी आराध्या ताजणे हिने यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा केली तर पोवाडा तेजस्वीनी चव्हाण व आरोही घोलप हिने सादर केला
