{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

सर्व सामान्यासह गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरचं ” आमदार आपल्या गांवात हे अभियान सुरु करण्याचा संकल्प असल्याचे मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले .
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळेच्या खोल्याच्या भूमिपूजन प्रसंगी आ . खताळ बोलत होते . कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक हरि म्हातारबा कोरडकर हे होते तर भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा मालुंजे माजी संरपच संदिप घुगे , डिग्रस संरपच अशोकराव खेमनर , उपसंरपच रंगन्नाथ बिडगर , दादा पाटील गुंजाळ , शरदराव भालेराव , नवनाथ वावरे , मच्छीद्र तांबडे , रामभाऊ रहाणे , शहाजी बिड‌गर , विनोद सुर्यवंशी , ॲड संदिप जगनर , रवि दातीर , वामन बर्डे , अनिल खेमनर , मोठ्याभाऊ खेमनर , मच्छीद्र कोरडकर , साहेबराव नान्नर, गणपत बिडगर , खंडू बिडगर , मुरलीधर बर्डे ग्रामसेविका श्रीमती रुपाली कहाणे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
Oplus_131072
यावेळी आमदार खताळ पुढे म्हणाले की , ना. राधाकृष्ण विखे पाटील हे तालुक्याचे प्रतिनिधी नसताना ही तालुक्याला सहाशे कोटी दिले होते आता तर महायुतीचाचं प्रतिनिधी असल्याने आता हजारो कोटी निधी मिळवून मुलभूत सुविधा निर्माण करु ‘ टँकर मुक्त तालुका धोरणानुसार प्राधान्यक्रम हे पाणी प्रश्न सोडविण्यावर भर असणार आहे असे शेवटी खताळ म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरपच अशोकराव खेमनर यांनी केले तर आभार ज्ञानदेव श्रीराम यांनी मानले .
विधानसभा निवडणुकाप्रमाणे जिल्हा परिषद , पचायत समिती , नगर पालिकासह विविध संस्थेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *