{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

अकोले । झुंजार न्यूज

थोर विचारवंत दादासाहेब रुपवते यांच्या जयंतीनिमित्ताने शुक्रवार दि . २८ फेबूवारी २०२५ रोजी भंडारदरा येथे धम्म यात्रा होत असल्याने नाशिक , अहिल्यानगर व मुंबई येथील सर्व अनुयांयांनी या धम्म यात्रे सहभागी व्हावे असे आवाहन रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केले आहे .

 

 

 

 

 

 

विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की ,महाराष्ट्र राज्याचे विविध खात्यांचे माजी मंत्री थोर विचारवंत , अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थात कालकथित दादासाहेब रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले आणि संगमनेर तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या अकोले या त्यावेळच्या अतिदुर्गम छोट्याशा गावी झाला आणि त्यांचे निर्वाण २३ जुलै १९९९ रोजी मुंबई येथे झाले. त्यांचे स्मारक भंडारदरा येथेच उभारण्याचा निर्णय त्यांच्या अनुयायांनी आणि बहुजन शिक्षण संघाने घेतला. दादासाहेबांचे स्मारक, जेतवन विहार, मुलगंध कुटी विहाराच्या खालच्या बाजूला भंडारदरा येथे उभारण्यात आले. 
दादासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी २००० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख ह्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. २८ फेब्रुवारी हा दादासाहेब यांचा जन्मदिन व माघ पौर्णिमाची धम्म यात्रा यात महिनाभराचे अंतर असल्यामुळे दोन्ही कार्यक्रम २८ फेब्रुवारी या एकाच तारखेला साजरे करण्यात येत आहे .

  
.
२००१ पासून धम्म यात्रा व दादासाहेबांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम २८ फेब्रुवारीला साजरे करण्यात येतात. अशोक विजयादशमी (दि. १४ ऑक्टोबर १९५६) रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जुना, बुरसटलेला, अन्यायी हिंदू धर्म त्यागून भगवान बुध्दाच्या धम्मात आपल्या लाखो अनुयायांसहित प्रवेश केला. क्रांतीकारक इतिहास घडविणाऱ्या या घटनेमुळे भारतभर बौद्ध धम्माविषयी जागरूकता निर्माण झाली. भगवान बुध्दानी अडीच हजार वर्षांपूर्वी सारनाथ येथे गतिमान केलेले धम्मचक्र मधल्या काळात थांबले होते. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी पुन्हा गतिमान केले. हे धम्मचक्र पुन्हा गतीने व जोमाने फिरू लागले. दुर्दैवाने धम्मदीक्षेनंतर थोड्याच काळाने महामानवांचे महापरिनिर्वाण झाले. गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये धम्म दीक्षेचे कार्यक्रम आयोजित होऊ लागले आहे .
Oplus_131072

 

 

दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी धम्मदीक्षेचे सोहळे सर्वत्र आयोजित केले. धम्मबांधवाना एकत्र येण्यासाठी जिल्ह्यात दरवर्षी धम्म यात्रेचे आयोजन करण्याचे ठरविले होते. त्यांचेच औचित्य साधून भंडारदरा या नयनरम्य, निसर्गरम्य , थंड हवेच्या ठिकाणी माघ महिन्याची पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या दिवशी १९६२ साली पहिल्या धम्म यात्रेचे आयोजन केले. महापरिनिर्वाणापूर्वी अडीच हजार वर्षांपूर्वी कुशीनारा येथे, तथागत भगवान बुद्धांनी आनंदला सांगितले की, धम्मच सगळ्यांचा मार्गदर्शक असेल आणि गुरु ही असेल. भगवंतांच्या जीवनाशी निगडित चार महत्वाच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या. त्या चार ठिकाणाची धम्म उपासकांनी यात्रा केली तर त्यांना प्रत्यक्ष भगवान बुध्दाना भेटल्याचे पुण्य व समाधान मिळेल”

 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *