{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

झरेकाठीसह आश्वी व परिसरातील शिवभक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनास मोठी गर्दी केल्याचे दिसले. संगमनेर तालुक्यातील पूर्व भागात गावोगावी महापुजा, महाआरती, धार्मिक कार्यक्रम पार पडले. हर हर महादेव, जय भोलेचा गजर करीत शिवभक्त झरेकाठी येथील शिव आश्रमात लीन झाले.
यावेळी महाप्रसादाचा शिवभक्तांनी लाभ घेतला. झरेकाठी येथे शिव आश्रमात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. साई नागभूषण महाराज यांनी अपार कष्टातून ३ एकरात उभे केलेल्या शिव आश्रमात भाविकांनी मनोभावे शिव पूजन केले. सकाळी ४ वा. महा आरती व अभिषेकानंतर दर्शनास सुरुवात झाली.
यावेळी शाबुदाना वडा, दहि व खजूर महाप्रसादाचा मनमुराद आस्वाद घेत शिवभक्त घराकडे परतले. ९ क्विंटल शाबुदाणा, ७ क्विंटल खंजूर, ४ क्विंटल शेगदाणा , ६०० कि . दही , ताक केळी महाप्रसाद सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाटल्याचे दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई नागभूषण महाराज , प्रा. कान्हुजी गिते , डॉ. रंगनाथ गिते , आदिनाथ वाणी , डॉ.संजय बालोटे , सुधीर महाराज , नीलेश कुटे आदीसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले .
झरेकाठी येथी शिव आश्रमात कर्नाटक राज्यासह नाशिक , पुणे , मुंबई व आश्वी व परिसरातून १५ ते २० हजार भक्तांनी दर्शन घेतले तर झरेकाठी येथील महिलांनी भक्ती भावाने शाबुदाणा वडा बनविण्यास तर युवकांनी वाढण्यास मोठे सहकार्य केले .
तरुणांकडून खिचडी महाप्रसादाचे वाटप
संगमनेर तालुक्यातील पानोडी, शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपूर, आश्वी खुर्द, आधी बु., निमगाव जाळी, मालुंजे, शेडगाव आदी ठिकाणी शिवरात्रीनिमित्त तरुणाई एकत्र येत खिचडी महाप्रसादाचे वाटप केले .
साई नाग भूषण महाराज यांनी १४ तास जागेवर बसून दर्शनास आलेल्या भाविकांना रुद्राक्ष व केळी शिवप्रसादाचा वाटप केला १ लाख ११ हजार १११ रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *