{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

अहिल्यानगर । झुंजार न्यूज 

जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक येथे रविवारी दि. २ मार्च २०२५ रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता या धम्म परिषदेला प्रारंभ होणार आहे. या परिषदेसाठी भारतासह वेगवेगळ्या देशांतील बौद्ध भिख्खू उपस्थित राहणार आहेत. या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.
Oplus_131072
धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय शिरसाट, मंत्री गिरीश महाजन आदींसह अनेक खासदार, आमदार आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
Oplus_131072
या जागतिक बौद्ध महापरिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा आदर करणारा समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे. बौद्ध धम्म परिषदेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आणि गावागावांतून बौद्ध उपासक, उपासिका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 
Oplus_131072
या परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, दिपकराव गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते संजय कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *