{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

आश्वी बुद्रूक येथील अप्पर तहसिल कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ शेतकरी महीला विद्यार्थ्यांची अडचण दूर करा,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकार्याना दिला आहे.

 

 

 

पद्मश्रीं डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे प्रवरा बँकेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र थेटे निवृती सांगळे नारायण कहार सौ.रोहीणी निघुते गीताराम तांबे भगवानराव इलग संजय गांधी अशोकराव म्हसे भाऊसाहेब जर्हाड कारभारी म्हसे भाऊसाहेब लोखंडे संजय सातपुते सुनिल डेंगळे सुरेश भुसाळ पंढरीनाथ अनर्थे भिमा बुधे अशोक जोशी हौशीराम तांबे भिमा शिंदे बापुसाहेब गायकवाड आदी प्रतिनिधी आश्वी खुर्द आणि बुद्रुक निमगावजाळी चिंचपूर प्रतापपूर दाढ खुर्द उंबरी ओझर गावातून उपस्थित होते.

 

 

 

आश्वी बुद्रूक येथे सुरू होणार्या अप्पर तहसिल कार्यालयाला केवळ राजकीय भूमिकेतून विरोध केला जात असून,हे कार्यालय ताताडीने सुरू न झाल्यास आंदोलन तसेच कायदेशीर लढाई करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

 

याप्रसंगी बोलताना कैलास तांबे म्हणाले की नागरीकांची सोय व्हावी हीच भूमिका महसूल विभागाची आहे.यातून ग्रामीण भागातील लोकांना शासकीय व्यवस्थेची मदत वेळेत होवू शकेल.

 

 

 

मच्छिंद्र थेटे यांनी निमगावजाळी येथे पुर्वी पेशवे काळात तहसिल कार्यालय होतेच.नंतरच्या काळात खरेदी विक्रीचे कार्यालय सुरू करून प्रशासनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न यापुर्वी महसूल विभागाने केला असल्याचे सांगितले.

 

 

जेष्ठ नेते नारायण कहार यांनी सामान्य माणसाच्या हिताचा विचार करा.शासकीय कार्यालयातील सेवा वेळेत मिळाल्यातर लोकांना दिलासा मिळेल.पुर्वीची प्रशासकीय व्यवस्था पाहीली तर आश्वी येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू होणे गैर नाही.

 

 

अॅड रोहीणी निघुते यांनी हे कार्यालय सुरू झाले तर वयोवृध्द आणि महीलांना संगमनेरला येण्याचा त्रास वाचेल स्थानिक पातळीवर योजनांची माहीती घेणे महीला, महाविद्यालयीन विद्यार्थीना सोपे होईल आशी भूमिका मांडली.

 

 

 

आश्वी आणि पंचक्रोशीतील गावांना संगमनेर तहसिल कार्यालय मोठ्या अंतरावर असल्याने सर्व शासकीय किंवा योजनांच्या कामासाठी शेतकरी महीला विद्यार्थ्यांना संगमनेर येथे जावे लागते.नागरीकांच्या सोयीसाठी अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचे धोरण महसूल विभागाने घेतल्याचा मोठा दिलासा या भागातील ग्रामस्थांना मिळणार असल्याची भूमिका शिष्टमंडळाने प्रशसानापुढे मांडली.

 

 

 

मात्र अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्यास जाणीव पुर्वक विरोध करून एकप्रकारे या गावांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

 

 

कोणाच्याही विरोधाला न जुमानता आश्वी बुद्रूक येथील अप्पर तहसिल कार्यालय सुरू करावे,आश्वी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याच्या मागणीची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed