{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"remove_bg":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वा.अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

 

 

 

 

अगदी तरुण वयात स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करणारे स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य हे पुढील पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर व आधुनिकता ही तत्वे रुजवली. ही तत्व आज देशासाठी अनुकरणीय ठरली आहे. याच तत्वांवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्था आदर्शवत काम करत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष संगमनेर तालुक्यात विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने साजरे केले.

 

 

 

Oplus_131072

 

शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी 15 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना सकाळी 9 वा. पुष्पांजली व आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

 

 

Oplus_131072

 

 

याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा.खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे,सौ.दुर्गाताई तांबे, सौ.कांचनताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा.खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, इंद्रजीतभाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, सौ.अर्चनाताई बालोडे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे,सिताराम राऊत, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, प्रा.बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, सुरेश झावरे, जावेद शेख यांचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Oplus_131072

तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed