स्त्री हिच्यात अनेक रुपे : सौ शारदा गोरक्ष कर्पे

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, तर ती सहनशीलतेची, प्रेमाची आणि त्यागाची मूर्ती आहे. तिच्या अंतःकरणात मातृत्वाचा अमृतस्रोत आहे, तर तिच्या मनगटात संपूर्ण जग बदलण्याची ताकद आहे.

 

 

 

 

तिच्या अंगी असलेल्या सद्गुणांचे कौतुकच आहे :

प्रेम, ममता आणि सहनशीलता ह्या तिच्या सहजसिद्ध गुण आहेत. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्यासाठी ती स्वतःच्या इच्छा, गरजा आणि वेळेचा त्याग करते. कठीण परिस्थितीत धैर्याने उभे राहून ती संकटांचा सामना करते. घराचे व्यवस्थापन, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी जुळवून घेणे आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणे, हे सर्व ती सहजतेने करते.

 

Oplus_131072

 

 

 

तिच्या त्यागाची आणि परिश्रमाची महती:

तिच्या नाजूक हातांनी घराचा संसार उभा राहतो, आणि तिच्या श्रमाने कुटुंब सुखी होते. ती फक्त घर सांभाळत नाही, तर घराला “घरपण” देते. कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या कुटुंबासाठी अविरत झटते. कधी आई म्हणून, कधी पत्नी म्हणून, कधी मुलगी म्हणून, तर कधी बहीण म्हणून – तिची भूमिका नेहमीच त्यागाची असते.

 

 

Oplus_131072

महिलांमुळेच जगाचे अस्तित्व:

स्त्री ही सृष्टीची जननी आहे. तिच्या मुळेच जीवनाचा प्रवाह अखंड सुरू राहतो. तीच जन्मदात्री, तीच पालनकर्त्री, आणि तीच प्रेरणादात्री आहे. जर स्त्री नसती, तर या जगाचे अस्तित्वही नसते. महिला स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तिळवण तेली समाजातील महिलांचे संघटन करून व विविध बचत गट तयार करून, सौ. शारदा कर्पे यांनी २००६ मध्ये जय संताजी महिला मंडळाची स्थापना केली. त्यांच्या मंडळातील सर्व महिला सभासद विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आनंद घेत असतात.

 

 

 

 

Oplus_131072

सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी जय संताजी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. शारदा गोरक्ष कर्पे आणि त्यांच्या सोबत मंडळातील आणि बचत गटातील महिला सभासद कार्यरत असतात. सौ शारदा कर्पे,सौ. सुरेखा कर्पे, सौ. अनुराधा कर्पे, सौ. सुवर्णा कर्पे, श्रीमती प्रभावती कर्पे, सौ. कांतिका वाकचौरे, सौ. रंजना शिंदे, सौ. तारकेश्वरी वालझाडे, सौ. सुनिता कर्पे, सौ. कल्पना ढगे, सौ. राजश्री व्यवहारे, कु.अस्मिता कर्पे, सौ.स्वाती नागुलकर, सौ. छाया नागुलकर, सौ.भारती वालझाडे, सौ. अपर्णा शेलार, श्रीमती रेखा दुर्गुडे, सौ. पूजा कर्पे, सौ. तेजश्री पन्हाळे, सौ. मनिषा कर्पे, सौ.अर्चना कर्पे, सौ.ज्योती दुर्गुडे, सौ. गीता कर्पे, सौ.निलीमा कर्पे, सौ. वैशाली कर्पे, सौ. स्नेहल वालझाडे, सौ. सोनाली, वालझाडे, सौ. राधा कहाणे, सौ.योगिता वालझाडे, सौ. सविता पाबळकर, सौ. पूनम पन्हाळे, सौ.संगीता कर्पे, सौ.ज्योती आणेकर ,सौ स्मिता वाकचौरे या सर्व महिला सभासद मिळून एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन केले.

 

 

 

Oplus_131072

महिला दिनी जय संताजी महिला मंडळ, संगमनेर यांच्या वतीने खांडगाव खांडेश्वर मंदिर येथे एक ट्रिप सुद्धा होईल आणि महिला दिन सुद्धा साजरा केला जाईल असा उद्देश साधून महिला दिन समारंभ साजरा करण्यात आला.

 

 

 

Oplus_131072

यावेळी समाजातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या खेळात सहभाग घेतला व आनंद घेतला. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने तिच्या प्रेमाला, कष्टांना, त्यागाला आणि सहनशीलतेला मानाचा मुजरा!

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed