{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी । झुंजार न्यूज

सोमवार दि १७ मार्च रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवनिमित्ताने संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील तरुणांनी जय भवानी , जय शिवाजी म्हणत शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी कडे प्रस्थान केले .
जय भवानी जय शिवाजी आदीसह विविध घोषणाबाजी देत छत्रपती शिवरायाच्या प्रतिमे समोर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून शेकडों तरुण मोठ्या उत्साहात शिव ज्योत आणण्याकरिता शिवनेरी गडाकडे रवाना झाले . शिव ज्योत आल्यानंतर सोमवार दि. १७  मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वा शिव ज्योतीची भव्य मिरवणुक तर सायंकाळी ७ वाजता भागवताचार्य ह.भ.प. किशोर महाराज जाधव यांचे शिव किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले .
Oplus_131072
यावेळी माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , माजी उपसंरपच अशोकराव तळेकर , सामाजिक कार्यकर्ते , रावसाहेब घुगे , ग्रा प सदस्य संजय जाधव , सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग सांगळे , अशोकराव सांगळे , पत्रकार राजेश गायकवाड , दत्तात्रय चव्हाण , भाऊसाहेब सोनवणे , आयोजक दिपक जाधव , संतोष चव्हाण , गोट्या पाबळ , वेनुनाथ तळेकर , मंगेश जाधव , आदीसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed