पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने इतरत्र खर्च टाळून नविन पिढीला संभाजी महाराज समजावे या उद्देशाने विद्यार्थी , तरुण व ग्रामस्थांना ” छावा ” हा सिनेमा राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात यांच्या पुढाकाराने दाखविण्यात आला .

यावेळी संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित ” छावा ” सिनेमाला सुरुवात करण्यात आले यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक तथा उपसंरपच विक्रमराजे थोरात , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे , मुख्याध्यापक सोनवणे , गणेश जाधव , बाळू नागरे , राजेश गायकवाड , संतोष चव्हाण आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी उपसंरपच विक्रम थोरात म्हणाले की वायफट खर्च न करता हा एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम घेतला असून छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक संघर्षांना मात दिली असून नवीन पिढींना इतिहास जपण्यासाठी काळाची गरज आहे व धर्म जपतच माणुसकी देखील जपण्याची भावना व्यक्त केली तर

संरपच गणपत हजारे की युवा पिढीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहासाला पुस्तकात न ठेवता आपल्या आचरणात आणण्याची गरज असून छत्रपती संभाजी महाराज यांनी 134 युद्धात शत्रूंना पराभूत केलेले असून त्यांचे आचरण अंगीकृत घेण्याची भावना व्यक्त केली
