आश्वी । झुंजार न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर भाषण स्पर्धा,गायन स्पर्धा तसेच विविध वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. मुलींच्या विविध कला गुणावा वाव देण्यासाठी अभ्यासा बरोबर कला तसेच क्रिडां गुणाना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असल्याचे वर्ग शिक्षिका संगिता क्षीरसागर यांनी सांगितले.

मिशन आरंभ २०२४-२५ अतंर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मुली आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथील शाळेचा निकाल ७७.२७ टक्के लागला असुन परीक्षेमध्ये ४४ पैकी ३४ विद्यार्तीनी पात्र झाल्या असुन शरयू साहेबराव किर्वे हिला २२८ गुण मिळवत शाळेमध्ये पहिली आली तर आराध्य वैभव ताजणे हिला २०० गुण मिळत शाळे मध्ये दुसरी आली.

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ३०० गुणासाठी घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मुली आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथील शरयू किर्वे हिला २२८ गुण, आराध्य ताजणे २०० गुण. हुमेमा तांबेळी १९८ गुण, साधना पाचारणे १९६ गुण तसेच आरोही घोलप व आराध्या घुगे यांना १९४ गुण मिळाले.

यशस्वी विद्यार्थीनीचे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकुर, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक त्रिभवन, केंद्र प्रमुख रविंद्र अनाप, मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते, संगिता क्षिरसागर,लता बिडवे,रंजना शिंदे, रामदास ढगे,हैशिराम मेचकर,विजया लांडगे,वर्षा कुऱ्हाडे यासह शाळा व्यवस्थापण समितीने यशस्वी विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.
