संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ एमबीए महाविद्यालय व सेंटर्डे क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक ३ आणि शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषद् सपन्न झाली असल्याची माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.

 

 

Oplus_131072

 

याविषयी माहिती देताना ते म्हणाले कि,  लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत देदीप्यमान यश संपादन केलेले आहे. त्यामध्ये महाविद्यालयात दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार कॉन्फरन्सेस चे आयोजन, आणि नवीन उद्योजक घडविण्याचे कार्य केले आहे. अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायम संलग्नित असून महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा राखलेली आहे. तसेच महाविद्यालयाने आय. एस. ओ. मानांकने प्राप्त केलेले असून सन २०२४ मध्ये महाविद्यालयाने युजीसी चे NAAC चे “ए ग्रेड मानांकन मिळवलेले आहे. महाविद्यालयास पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन केंद्रास मान्यता मिळालेली आहे.

 

 

 

Oplus_131072

 

अमृतवाहिनी एमबीए मध्ये केवळ पाठ्यक्रम अभ्यासक्रम न शिकवता विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात व त्याचप्रमाणे उद्योजक सुद्धा निर्माण करण्याचे कार्य केले जाते. त्यासाठीच उद्योग व्यवसायातील एक महत्वाचा भाग म्हणूनं अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात ३ आणि ४ एप्रिल २०२५ रोजी इंटरप्रेनरशिप अँड इनोवेशन या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घािटनासाठी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी नामदार बाळासाहेब थोरात तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. शरयू देशमुख तसेच संस्थेचे सीईओ अनिल शिंदे. मॅनेजर व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे. बी. गुरव यांची उपस्थिती लाभली. या परिषदेत ३०० हून अधिक देश, विदेशातील प्रख्यात वक्ते, उद्योग तज्ञ आणि नवोदित उद्योजक यांनी सहभाग नोंदविला तसेच ८०० हून अधिक श्रोत्यांनी या परिषदेचा लाभ ऑनलाईन घेतला. यामध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथील डॉ. अशोका जिनादासा, मास्टर ट्रेनर अँड कोच फॉर वेल्थ अँड सक्सेस, अवार्ड विनिंग ऑथर, यांनी एंटरप्रेरेंशिप आणि इनोवेशन या विषयवार जागतिक पातळीवरील उद्योजकता अणि त्यात्तिल नाविन्याता याबाबत मार्गदर्शन केले.

 

 

 

Oplus_131072

त्यानंतर दुपारच्या सेशनला नाशिक येथील अमोल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर श्री अमोल कासार यांनी बिझनेस मध्ये पुनरागमन कसे करायचे, परिस्थितीला प्रतिसाद कसा दयाचा आपल्याला सेंटरडे क्लबच्या माध्यमातून पाठिंबा आहे. घाबरू नका आणि आशा सोडू नका, आपण विशेष आहात. अपयशाची चिंता करू नका तुम्ही तंत्रज्ञानासोबत आहात, व्यवसाय वाढविणे आपल्यासाठी अवघड नाही. उद्योजकासारखी आपली विचारसरणी बदलून नोकरी देणारा बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःला समजून घ्या तुम्हाला जे आवडेल ते कराआपल्या आवडी-निवडी तपासून पहा. पैशाची अपेक्षा न ठेवता व्यावहारिक अनुभव घ्या. आत्मविश्वास हे व्यावहारिक अनुभवाचे कार्य आहे. याबद्दल माहिती दिली.

 

 

 

Oplus_131072

त्यानंतर पुणे येथील प्रसिद्ध बिझनेस कोच व व्यवसायिक डॉ. सोमनाथ शिंगारे यांनी सर्वप्रथम व्यवसाय हेतू सेट करा, एमएसएमई योगदान हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यवसायाचा कणा आहे. आपण किती शिकता हे महत्वाचे नाही, आपण किती अंमलात आणता हे महत्वाचे आहे लेखनामुळे स्पष्टता येते, मानसिकता 80% आहे, रणनीती 20% आहे, आयुष्यभर शिकणारे व्हा, ऊर्जा महत्वाची आहे. या प्रसिद्ध उद्योजकांची प्रमुख व्याख्याने झाली. तसेच शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी नाशिक येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी आपण सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय याबाबत विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून ते आज पर्यंत आपल्या व्यवसायामध्ये आलेली चढ उतार याचे प्रेक्टिकल उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना व्यवसायात यशस्वी कसे व्हायचे याबाबत मार्गदर्शन केले.

 

 

Oplus_131072

यानंतरच्या सत्रात दुबई येथील व्यावसायिक रियाज राज माजी विद्यार्थी, फाउंडर डायरेक्टर ऑफ रिओ ब्रोस्ट चिकन रेस्टॉरंट लिमिटेड यांनी ऑनलाइन सेशन द्वारे विद्यार्थ्यांना परदेशामध्ये व्यवसाय कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन केले. तद नंतर, इंडोनेशिया येथील मालाहयाती युनिव्हर्सिटी लॅम्पग, येथील डॉ. मारलीना सुयोकी यांनी बिझनेस करण्यासाठीच्या विविध प्रकारच्या आयडिया विद्यार्थ्यांना दिल्या,

 

 

 

 

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या सत्रात समारोप कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चान्सलर डॉ. पराग कालकर यानी शिक्षण, व्यवसाय आणि त्यामध्ये सक्सेस कसा मिळवायचा याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर जेवढा वेळ घालवला जातो त्यापेक्षा दुप्पट वेळ प्रत्येकाने ग्रंथालयामध्ये बसून वाचन करावे, अभ्यास करावा तरच व्यवसायामध्ये, जीवनामध्ये यशस्वी व्हाल असे सांगितले. यानंतर अहिल्यानगर येथील कन्हैया ऍग्रोचे डायरेक्टर श्री सुरेश पठारे. या तज्ज्ञांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश व विदेशातील विविध लेखकांनी या एंटरप्रेरेंशिप आणि इनोव्हेशन या परिषदेसाठी व्जवळजवळ १०० रीसर्च पेपर लिहिले त्या रिसर्च पेपरचे जर्नल प्रोसिडिंगचे या मान्यवरांच्या हस्ते उदघाटन व प्रदर्शन करण्यात आले.

 

 

 

 

या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स च्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे तसेच या परिषदेचे कॉर्डिनेटर डॉ. एल. डी. शहा आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीचे प्रयत्न केले. त्याबद्दल अमृतवाहिनी एमबीएच्या सर्व स्टाफचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) विश्वस्त आमदार ार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त विश्वस्त सौ. सौ. शरयूताई देशमुख, साखर कारखान्याचे संचालक माननीय इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल शिंदे, शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे. बी. गुरव यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed