पाथरे । झुंजार न्यूज
पाथरे बु ॥ येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महिला पालक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येवून शिक्षण संचालिका श्रीमती सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” चला पैठणी जिंकूया ” हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंरपच सौ शाहिन शेख ह्या होत्या .

यावेळी प्रमुख मार्गदर्शन सरोदे म्हणाल्या की, बदलत्या जगात आपला पाल्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महिला पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे श्रीमती सरोदे ह्या म्हणाल्या

यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या “चला पैठणी जिंकूया” या कार्यक्रमांमध्ये उखाणे स्पर्धा, शाळेविषयी मनोगत व्यक्त करणे, मनोरंजक खेळ,मनोरंजक प्रश्न ची मुक्त उत्तरे असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या यातून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विजेत्या स्पर्धकांना पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते भेट देण्यात आली

यावेळी प्रवरा कन्या विद्या मंदिरांच्या प्राचार्या सौ . कुमकर , डॉ. खाडे , रंजना पवार, ॲबॅकसच्या संचालिका अर्चना पाटील , विद्यालयाचे प्राचार्य बारगुजे ,उपप्राचार्य सौ. वाणी , पर्यवेक्षक तांबे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक घुगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज डॉ.संदीप म्हस्के , शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी -विद्यार्थिनी व पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन को-हाळे व श्रीमती घोलप यांनी केले
