आश्वी । झुंजार न्यूज

समाजाला दिशा देण्याचे काम संत महात्म्यांनी केले त्यांचे विचार भविष्यकाळात आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भारत पाटील गीते यांनी श्रीराम तरुण मित्र मंडळ यांनी बांधलेल्या राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कमानीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले
Oplus_131072
ते बोलताना म्हणाले की संत हे पुन्हा एका विशिष्ट समाजाचे नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काम करत आहे त्यांनी केलेली समाजासाठी काम त्यातून उतराई होण्यासाठी पिंपरी लौकी अजमपुर तालुका संगमनेर येथील श्रीराम तरुण मित्र मंडळाने त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या कमानीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले पिंपरी लौकी अजमपुर हे गाव सर्वांगीण विकास साकडे वाटचाल करीत आहे या गावाचा भौगोलिक विस्तार बघता लोखंडी पूल गिते वस्ती वरील श्रीराम तरुण मित्र मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने निश्चित प्रेरणास्थान आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सर्व समाजासाठी तन-मन-धनाने काम केले त्यांचाही कामाचा समाजाच्या प्रत्येक घटकाला उपयोग झाला यापुढेही त्यांचे नाव चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंतभूतलावर राहील यात शंका नाही संत भगवान बाबा यांचाही मोठा भक्त परिवारातून या कमानीच्या माध्यमातून भक्तांना त्यांचे दर्शन होईल किती वस्तीवरील तरुण मंडळाने राबवलेला उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे असे गौरउद्गार काढले
Oplus_131072
याप्रसंगी हरिभक्त परायण शांताराम महाराज जोरी  सरपंच सतीश जोशी भाऊसाहेब मुंडे भाऊसाहेब लावरे सुखदेव दादा गीते नारायण काका कहार नामदेव दादा गीते भीमराज गीते सिताराम गीते तुकाराम दादा गीते राजेंद्र गीते गोकुळ गीते बाळासाहेब गीते जयराम गीते संभाजी गीते अनिल गीते विठ्ठल गीते एकनाथ गीते रावसाहेब गीते कैलास गिते श्रीराम गिते ज्ञानदेव गिते सह श्रीराम मित्र मंडळाचे सर्व युवक कार्यकर्ते उपस्थित होते
Oplus_131072
याप्रसंगी युवक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *