आश्वी । झुंजार न्यूज   

( योगेश रातडीया )

 

भगवान महावीर हे फक्त जैन धर्माचे तीर्थंकर नव्हेत तर ते प्रतिभासंपन्न वैधानिक व विश्वगुरु होते.त्यांनी जगाला जगा आणी जगु द्या चा संदेश दिला यात चार वेद, ३८आगम,८४हजार ग्रथां चा सार आहे.म्हणुनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितेल होते की ज्या दिवशी महावीरा चा सिध्दांत सोडला जाईल त्या दिवशी जगाचा पतनाची सुरुवात होईल आज जगाने अहिंसा सोडुन हिंसेचा सत्य सोडुन असत्या चा स्वीकार केल्याने जगात अशांतता निर्माण झाल्याचे जैन साध्वी आदर्श ज्योतीजी महाराज यांनी सांगितेल.    

 

 

 

Oplus_131072

 

अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है जीवो और जीने दो सबको सुख पाने दो चा संदेश देत जैन ध॔मा चे २४वे तिथ॔कंर भगवान महावीर स्वामी चा जन्म कल्याण महोत्सव  व मधुरवक्ता डॉ. आत्मज्योतिजी म. सा का ३२ वा दीक्षा दिवस आश्वी त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

 

Oplus_131072

 

जैन धर्मा चे २४ वे तिथ॔कंर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती  साठी आश्वी बु येथील जैन स्थानकात  उपस्थित जैन  साध्वी दक्षिणज्योती  डॉ. आदर्शज्योतिजी म. सा, मधुरवक्ता डॉ. आत्मज्योतिजी म. सा,संगितप्रेमी  डॉ. रजतज्योतिजी म. सा. यांचा आशीर्वादाने  गुरुवारी सकाळी  अँड अशोक  बोरा , दिपक बोरा, किरण बोरा परिवाकडून जैन ध्वजाचे अनावरानंतर  भव्य अशी अहिंसा रॅली काढण्यात आली

 

 

 

Oplus_131072

अग्रभागी मंगल कलश घेतलेल्या मुली महिला मध्यभागी भगवान महावीरांची प्रतिमा असलेला अहिंसा रथ मागे सफेद कपडे घातलेले पुरुष जिओ और जीने दो सबको सुख पाने दो अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है च्या घोषणा देत गावातील मुख्य मार्गावरून संदेश देत आनंद चौकातून पुन्हा जैन स्थानकात पोहोचली     

 

 

 

Oplus_131072

या ठिकाणी आनंद दरबारात आनंद जैन पाठशाळे  च्या मुलांनी धार्मिक सांस्कृतिक महावीर जन्मा वर अधारीत नाटीका सादर केल्या अ‍ॅड. अशोकलाल बोरा यांच्या देणगीतून साकारलेल्या जैन धर्म स्थानकातील लिफ्टचे उद्घाटन संपन्न झाले. या वेळी आश्वी जैन श्रावक संघाचे वतीने दक्षिण ज्योती आदर्श ज्योतीजी महाराज यांना वात्सल्य सिंधु उपाधीने सन्मानित करण्यात आले . मधुरवक्ता डॉ. आत्मज्योतिजी म. सा का ३२ वा दीक्षा दिवस साजरा करण्यात आला

 

 

 

Oplus_131072

यानंतर जैन साध्वींचा सुमधुर व अमृततुल्य प्रवचनाचा लाभ उपस्थित भाविकांना घेतला. यानंतर स्व. शांताबाई मुळचंदजी बोरा परिवाकडून गौतम प्रसादाचे आयोजन करण्यातआले.

 

 

Oplus_131072

 

दरम्यान भगवान महावीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सायंकाळी ६ वा. सुभाषलाल गांधी, सुमतीलाल गांधी, संतोष भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, नितिन गांधी, अमित गांधी, अश्‍विन मुथ्था यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघ आणि नवकार ग्रुप युवक मंडळाने परिश्रम घेतले. या वेळी जैन व जैनेत्तर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *