शिबलापूर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे क्रांती ज्योति सूर्य महात्मा फुले व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन दिवशीय संयुक्त जयंती निमित्ताने प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या व्याख्यानासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयुक्त जयंती आयोजकांनी दिली आहे .

महापुरुषाच्या जातीत जन्माला आलो म्हणून त्यावर ताकद दाखवण्यापेक्षा त्याच्या विचारावर हक्क दाखवून त्याचे विचार, मनाच ठेवुन त्याच्या विचारावर काम केल्यावर आपण खऱ्या अर्थानी त्याच्या विचाराचे वारसदार होवू या म्हणीनुसार शिबलापूर येथील तरुणांनी एकत्र येत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन केले .

रविवार दि . १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वा.
मल्ल खांब खेळ ( फिनिक्स मलख्यां ब अॅकडमी ) सायंकाळी ७ वा. प्रा. विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान होईल. तर दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वा. पारंपारिक वेशभूषातून शालेय विद्यार्थीची मिरवणुक , सकाळी १० वा . रक्तदान शिबीर व मोफत सर्वरोग निदान शिबीर , दुपारी १२ वा. महापुरुषांना पुष्पहार अर्पण , दुपारी १२.३० वा. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम , दुपारी २ वा. महाप्रसाद , पाणी वाटप , दुपारी ४ ते ९ वा.भव्य मिरवणुक व मर्दानी खेळ त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक नृत्यस्पर्धा २०२५ तसेच विविध स्पर्धेतून उत्तेजनार्थ पारितोषिक व बक्षिस वितरण होईल .

तरी होणाऱ्या संयुक्त जयंतीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
