उडान २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर । झुंजार न्यूज
माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही गुणवत्तेच्या बाबतीत देशात नावाजलेली असून अमृतवाहिनीत शैक्षणिक ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य कशी जोपासावी याचे शिक्षण दिले जात असल्याचे गौरोद्गार पुणे स्थित मेव्हिन आरपीओ सोल्यूशन प्रा. लिमिटेड चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश अय्यर यांनी काढले आहे.

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ.बी.एम. लोंढे, समन्वयक डॉ. आर. बी. सातपुते, अकॅडेमिक कॉर्डिनेटर डॉ. एस. के. निंबाळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश अय्यर म्हणाले कि, अमृतवाहिनीत शैक्षणिक ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य कशी जोपासावी, सामाजिक बांधिलकी कशी जपावी तसेच विद्यार्थ्यांनी केवळ आत्मकेंद्रित विचार न करता समाजाभिमुख विचार करून समाजाचा विकास कसा साधता येईल असे नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी उच्च स्वप्ने उराशी बाळगून ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. यावेळी जीवन जगण्याचा फॉर्म्युला सांगितला स्वप्न, विश्वास, परिभाषित यश व्यवस्थापित करा म्हणजे सुयश मिळेल. तुम्हीच तुमचा सर्वात मोठा अडथळा आहात. त्यावर मात करा. तुमच्या मनावर गुंतवणूक करा. तुमच्या मर्यादा वाढवा. तुम्ही स्वतःवर प्रभाव टाकू शकता तुम्ही कोण आहात? तुमचा उद्देश काय आहे? तुमच्या मर्यादा तुमचे जग ओळखा. तुमच्या मर्यादा निवडा, परिभाषित करा. तुमचे स्वतःचे जग तयार करा. जीविनाचे सार्थक करण्यासाठी शिकत रहा, नविन शोधत रहा असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी.एम. लोंढे म्हणाले कि, अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाची स्थापना स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून इ.स.१९९४-९५ मध्ये झाली. अमृतवाहिनी महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्यामध्ये स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट कक्ष, संगणक विभाग, होस्टेल व मेस सुविधा आणि ग्रीन कॅम्पस असल्याचे ते म्हणाले.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उडान २०२५ स्नेहसंमेलनाचे समन्वयक डॉ. आर. बी. सातपुते यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना त्यात FAREWELL या शब्दातील अर्थबोध स्पष्ट केला. त्यानंतर महाविद्यालयाचे अकॅडेमिक कॉर्डिनेटर डॉ. एस. के. निंबाळकर सर यांनी महाविद्यालयातील अकॅडेमिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर एमबीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयाबाबतचे विचार मांडले. त्यामध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातूनच आमचा सर्वांचा सर्वांगीण विकास घडतो, त्याबद्दल संस्थेचे, महाविद्यालयाचे संचालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.

या उडान २०२५ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमबीए प्रथम वर्षातील कुमारी. हुरुळे वैष्णवी, अभिषेक जोशी, कुमारी त्रिवेणी खर्डे, गोविंद ख्रिस्ते, यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन द्वितीय वर्षातील कुमारी हर्षदा नाईकवाडी या विद्यार्थिनींने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग एमबीए प्रथम वर्षातील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेबद्दल अमृतवाहिनी एमबीएच्या सर्व स्टाफचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी. गुरव यांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
मेधा २०२५ मध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेटमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले तसेच हॉलीबॉल मध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आणि एमबीएच्या विद्यार्थिनींनी क्रिकेटमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तसेच मिस्टर प्रतीक कुन्हे, ओम शहाणे, आणि गौरव गोसावी यांनी मेधा काईट फेस्टिवल मध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. कुमारी अवंतिका खैरनार हिने मेधा टॉक शोमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावले, तर राष्ट्रीय पातळीवरील सफायर मॅरेथॉन लायन्स क्लब संगमनेर आयोजित यामध्ये पंकज वाडेकर याने मेडल पटकाविले अशाप्रकारे विविध स्पर्धामधून सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
