संगमनेर । झुंजार न्यूज 

अमृतवाहिनी आयटीआय मध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या टाटा मोटर्स या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये आयटीआयच्या 120 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.
     
Oplus_131072
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कि, लोकनेते बाळासाहेब थोरात , मा आमदार डॉ. सुधीर तांबे विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय मध्ये सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच नोकरीची थेट संधी मिळावी याकरिता अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर ट्रेनिंग प्लेसमेंट शिक्षण विभागाच्या वतीने समन्वय केला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे येथील टाटा मोटर्स कम्पनींचा कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडला. यावेळी टाटा मोटर्सचे एच.आर.एक्झिक्युटिव्ह गणेश तळोले, ओम काकड, प्रसन्न जेधे यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी एकूण १२० विद्यार्थ्यांची निवड झाली.
   
Oplus_131072
या कॅम्पस इंटरव्यू आयोजनासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग व अमृतवाहिनी आयटीआय चा सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
   
Oplus_131072
निवड झालेल्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, विलास वपे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर जेबी गुरव, प्राचार्य विलास भाटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed