संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

सौ.शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील केंब्रिज विद्यापीठाची संलग्न झालेल्या संगमनेर मधील अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल ला गुणवत्तेमुळे राज्य पातळीवर विविध मानांकने मिळाली असून केंब्रिज विद्यापीठाच्या पहिली ते दहावी मधील विविध परीक्षांसाठीचे अधिकृत केंद्र म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य अंजली कन्नावार यांनी दिली आहे.

 

Oplus_131072

 

केंब्रिज अभ्यासक्रमासाठी इयत्ता पहिली ते दहावी विविध परीक्षांचे आयोजन होत असते यामध्ये चेक पॉइंट, निम्न माध्यमिक तपासणी केंद्र आयजीसीएसइ आणि ए स्तरावरील परीक्षा होणार आहे.

 

 

Oplus_131072

इंग्लिश अडवांटेज केंब्रिज इंग्रजी पात्रता प्रि ए 1 स्टार्टर्स, ए 1 मुव्हर्स, ए-2 फ्लायर्स, ए 2की B2 फर्स्ट अँड सी 1 ऍडव्हान्स युके महाविद्यालयीन बोर्ड 63501 प्रामाणिक चाचण्या ज्या युनायटेड अमेरिका आणि कॅनडामधील विद्यालयीन प्रवेशासाठी अत्यंत आवश्यक आहेत अशा प्राथमिक सॅट नॅशनल मेरिट स्कॉलरशिप टेस्ट स्क्वालिटीस असाइन्मेंट टेस्ट ऍडव्हान्स प्लेसमेंट याबाबत परीक्षा घेतल्या जातात.

 

 

Oplus_131072

सॅट ही शैक्षणिक मूल्यांकन चाचणी आहे जी महाविद्यालयीन मंडळाने पदवीधर कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी निश्चित केली आहे सॅट परीक्षेचे निकाल 48 हून अधिक देश व 4000 विद्यापीठांनी स्वीकारले आहे. अमेरिकेमधील अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये घेतली जाते तसेच ही परीक्षा मे जून ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबर मध्ये आठ वेळा आठवड्याच्या शेवटी घेतली जाते.

 

 

Oplus_131072

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण संगमनेर मध्ये मिळावे याकरता संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या संकल्पनेतून या परीक्षांचे आयोजन अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल मध्ये होत असते.

 

 

 

केंब्रिज विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व परीक्षांचे अधिकृत केंद्र म्हणून अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलची निवड झाली असून या परीक्षांसाठी नाशिक अहिल्यानगर पुणे येथील अनेक विद्यार्थी सॅट परीक्षेसाठी दाखल होऊ लागले आहेत. अत्यंत निसर्गरम्य व गुणवत्तापूर्ण असलेल्या अमृतवाहिनीच्या वातावरणात या सर्व विद्यार्थ्यांना अमृतवाहिनी कडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी पालकांनी या लिंक https://satsuite.collegeboard.org/sat/registration वर आपले नाव नोंदवावे असे आवाहन अमृतवाहिनी न्यूडो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed