सुमारे 10 हजार नागरिक सहभागी होण्याचा अंदाज
शहर व तालुक्यातील सर्व समाजांच्या वतीने जय्यत तयारी
संगमनेर । झुंजार न्यूज





गोपाळकाला ही आपली धार्मिक परंपरा
गोपाळकाला मध्ये सर्व नागरिक, महिला आपल्या घरचा शिधा, भाजी भाकरी घेऊन एकत्र येतात आणि तो प्रसाद म्हणून सेवन करतात. हीच सामाजिक समतेची सलोख्याची व बंधुभावाची ही परंपरा अधिक घट्ट होण्यासाठी समतेची मिसळ हा सर्वांनी आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद व महाराष्ट्राला दिशादर्शक असल्याचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
डॉ.अनिरुद्ध वनगर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
महाराष्ट्र दिनानिमित्त यशोधन मैदानावर सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारा शिवराय ते भीमराव या गीतांचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक डॉ.अनिरुद्ध वनकर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ही तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
