केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना . नितीन गडकरी यांच्या हस्ते !
आश्वी । झुंजार न्यूज
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ४५ वी पुण्यतिथी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती निमीत्ताने त्यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दि. ९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लोणी बु॥ बाजार तळ येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना . नितिन गडकरी यांच्या हस्ते , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली .

या कार्यक्रमासाठी आ शिवाजीराव कर्डीले , आ. श्रीमती मोनिका राजळे , आ.डॉ. किरण लहामटे , आ. विठ्ठलराव लंघे ,आ. काशिनाथ दाते , आ. विक्रम पाचपुते , आ. अमोल खताळ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे .

तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील , प्रवरा अभिमत विदयापीठ कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील , माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले .
Post Views: 688
